ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

जवळा बाजार येथे शिक्षणमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन:ठाकरे गटाकडून राजीनाम्याची मागणी, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

6 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात टीईटी परिक्षेचा पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजिनामा द्यावा अशी मागणीकरीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ता. २९ जवळा बाजार (ता.औंढा) येथे भुसे यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. राज्यात नुकत्याच झालेल्या टीईटी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या गुरुजींमध्ये तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. केंद्राच्या दुर्लक्षामुळे नीटचा पेपर फुटला तर राज्याच्या दुर्लक्षाने टीईटीचा पेपर फुटला आहे.या दोन्ही प्रकरणाला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. टीईटी पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या छायाचित्राला जोडेमारो आंदोलन केले. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली झटे, दत्तराव अंभोरे, सुरेश सवंडकर, सखाराम कदम, मुंजाजी पावडे, आकाश अंभोरे, एन. डी. नागरे, मुंजाअप्पा ढोबळे, भगवानराव ढोबळे, एकनाथ कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी जिल्हा प्रमुख देशमुख तसेच माऊली झटे यांनी मार्गदर्शन केले. शासनाच्या निष्काळजीपणामुळेच पेपर फुटीची प्रकरणे होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्विकारून शिक्षणमंत्री भुसे यांनी राजिनामा द्यावा अशी मागणी करून कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी औंढा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिस प्रशासनाकडे निवेदन सादर केले तसेच तहसील प्रशासनामार्फत शासनाकडे निवेदन सादर केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर