ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

…तर देवाभाऊंच्या बायकोला घरचे काम करावे लागेल:करुणा मुंडेंची रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्यावरून मश्किल टिप्पणी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


परप्रांतीयांनी मुंबई सोडली तर देवाभाऊ अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बायकोला घरातले काम करावे लागेल, अशी मिश्किल टिप्पणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची करण्याच्या मुद्यावर भाष्य करताना केली आहे. करुणा मुंडे यांनी रविवारी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात त्यांनी धनंजय मुंडे, रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती, छत्रपती शिवाजी महाराजांचा कथित अवमान आदी विविध मुद्यांवर आपले मत मांडले. त्या म्हणाल्या, मनसे व भाजप जनतेची दिशाभूल करत आहे. मुंबईतील अनेक परप्रांतीय रिक्षा चालक आहेत. मराठी माणसे या व्यवसायात थोडीशी कमी आहेत. मी धनंजय मुंडे यांच्यासोबत तब्बल 27 वर्षे राहिले. त्यानंतरही मला मराठी नीट येत नाही. 2 वर्षांपूर्वी राजकारणात आल्यानंतर मराठी शिकले. मराठी भाषा कठीण आहे. याविषयी मी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. रिक्षा चालकांना मराठीची सक्ती करू नका अशी विनंती मी त्यांना करणार आहे. परप्रांतीय लोक सोडून गेले तर मुंबई अर्धी रिकामी होईल. मंत्र्यांच्या बंगल्यातही यूपी, बिहारवाले काम करतात. त्यामुळे हे लोक आपल्या राज्यात गेले तर सर्वांना स्वतःचे काम स्वतःच करावे लागेल. देवाभाऊंच्या बायकोलाही काम करावे लागेल, असे त्या म्हणाल्या. धीरेंद्र शास्त्रींचा घेतला खरपूस समाचार करुणा मुंडे यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींचाही खरपूस समाचार घेतला. तसेच आसाराम, बागेश्वर बाबा व अशोक खरात ही भाजप घोषित बाबा असल्याचा आरोपही केला. स्वयंघोषित भोंदूबाबांना राजकीय आश्रय भेटतो. त्यामुळे ते एवढे मोठे होतात. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तुम्ही काय बोलणार? तुमच्यासारखे बाबा लोक लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवतात. धीरेंद्र शास्त्रींची शिवाजी महाराजांवर बोलण्याची लायकीही नाही. आतापर्यंत अनेक भोंदू तुरुंगात गेले. पण त्यानंतरही त्यांची संख्या कमी होत नाही. हे बाबा लोक महिलांची तस्करी करतात. मी धीरेंद्र शास्त्रींना आव्हान देते. मी स्वतः ब्राह्मण आहे. मी त्यांना त्यांची लायकी दाखवून देईल. त्यांनी माझ्याशी वन टू वन डिबेटमध्ये येण्याचे धाडस दाखवावे, असे करुणा मुंडे म्हणाल्या. कोण आहेत करुणा शर्मा – मुंडे करूणा शर्मा या मूळच्या मध्य प्रदेशातील इंदूरच्या आहेत. काही कामानिमित्त त्या मुंबईत राहत होत्या. त्यांची व धनंजय मुंडे यांची 1996 पासून ओळख होती. त्यांच्या मते, 9 जानेवारी 1998 मध्ये त्या दोघांचा विवाह झाला होता. दोघांनीही आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. धनंजय व करुणा मुंडे यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. सर्वात आधी करूणा शर्मा यांचे नाव 2021 साली समोर आले होते. करूणा यांच्या लहाण बहिणीने धनंजय मुंडेंवर अत्याचाराचे आरोप केले. तेव्हा धनंजय मुंडे यांनी एका पोस्टद्वारे करूणा शर्मा यांच्यासोबतच्या नात्याची कबुली दिली होती. त्यानंतर धनंजय मुंडे आणि करूणा शर्मा यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर