ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

सोशल मीडियावरील प्रेम!:इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी विवाहितेने दीड महिन्याच्या बाळासह सोडले घर, 8 वर्षांचा संसार, 4 वर्षांचे मूल सोडले

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


समाजमाध्यमावर झालेल्या प्रेमात‎ एका विवाहित महिलेने आपल्या पती, ‎‎सासरचे आणि माहेरच्या सर्व ‎‎नातेवाइकांना नाकारत प्रियकरासोबत ‎‎जाण्याचा निर्णय घेतल्याची घटना‎ कन्नड ग्रामीण ठाण्यात समोर आली.‎ कन्नड ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक ‎‎पोलिस निरीक्षक नारायण गिते यांना ‎बीड पोलिसांकडून वायरलेसवर ‎संदेश मिळाला. चाळीसगाव‎ बाजूकडून कन्नड घाटाच्या दिशेने‎ एक विना क्रमांकाची काळ्या रंगाची ‎‎कार येत असून, ती ताब्यात घेण्याचे ‎‎आदेश होते. या माहितीवरून सपोनि ‎गिते, पोउनि बी. एम. मुंडे, महामार्ग‎ उपनिरीक्षक सागर पाटील, तावणे,‎महेश जाधव, गहिनीनाथ बावनकर,‎शहेनशहा सय्यद, महिला पोलिस ‎शेळके, शिरसाठ, आर. एन. वाव्हळ‎यांनी सकाळी 11 वाजता घाटातील‎ भांबरवाडी नाक्यावर सापळा रचला‎ आणि संशयित कार ताब्यात घेतली.‎ या कारमध्ये कारचालकासह एक ‎युवती आणि दीड महिन्याचे बाळ ‎होते. पोलिसांनी त्यांना ठाण्यात ‎आणून बीड पोलिसांना माहिती दिली.‎ बीड पोलिस ठाण्यात 13 जून रोजी ही‎ महिला दीड महिन्याच्या बाळासह ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎बेपत्ता झाल्याची तक्रार होती.‎ पोलिसांनी चौकशी केली असता या ‎महिलेचे आठ वर्षांपूर्वी एका‎ व्यापाऱ्यासोबत लग्न झाले असून,‎ तिला चार वर्षांचा आणि एक दीड ‎महिन्याचा अशी दोन मुले आहेत. ‎काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिची ‎बीडमधीलच एका पुरुषाशी ओळख ‎झाली. तो पुरुषही विवाहित असून‎ त्याला एक मुलगा आहे आणि तो‎ बेरोजगार आहे. या ओळखीचे ‎रूपांतर प्रेमात झाले आणि ती दीड ‎महिन्याच्या बाळाला घेऊन घर‎सोडून पळून आली होती. कुटूंबाने‎ मनधरणी केली मात्र, अपयश आले.‎ शेवटी जाताना तिने मागे‎ वळूनही पाहिलेच नाही‎ घटनेची माहिती मिळताच महिलेचा ‎पती, सासू, सासरे, आई-वडील‎ आणि भाऊ कन्नड ग्रामीण ठाण्यात‎ पोहोचले. सर्वांनी डोळ्यात अश्रू‎ आणून तिला घरी परतण्याची ‎विनवणी केली. पोलिसांनीही ‎मनधरणी केली. परंतु, महिलेने “मी ‎माझ्या स्वखुशीने या पुरुषासोबत ‎जात आहे,” असा लेखी जबाब ‎दिला. मागे वळून न पाहता बाळाला ‎कडेवर घेऊन प्रियकरासोबत गेली.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर