ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

इराणचा तेलवाहू जहाजावर हल्ला:अमेरिकेच्या ‘सेफसी विष्णू’वरील भारतीय अभियंत्याचा मृत्यू, इतरांना सुरक्षित बाहेर काढले

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


इराणने बुधवारी बसरा जवळील खोर अल जुबैर बंदर परिसरात अमेरिकन मालकीच्या ‘सेफसी विष्णू’ या क्रूड ऑइल टँकरवर हल्ला केला. या हल्ल्यात एक भारतीय क्रू सदस्याचा मृत्यू झाला असून उर्वरित 27 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मृत भारतीय क्रू सदस्याचे नाव नंदन प्रसाद सिंह असून ते जहाजावर अतिरिक्त मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. नंदन सिंह हे मूळचे बिहारचे रहिवासी होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते मुंबईतील कांदिवली येथे कुटुंबासह राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांनी यापूर्वी अनेक शिपिंग कंपन्यांमध्ये काम केले होते. त्यांच्या मेहुणे चंदन कुमार यांनी सांगितले की, कंपनीकडून मृत्यूची माहिती देण्यात आली असली तरी शिपिंग मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. नंदन सिंह यांचा मुलगा मुंबईबाहेर असल्याने तो शुक्रवारी परतल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. इराणने जबाबदरी स्वीकारली हा हल्ला 11 मार्च 2026 रोजी रात्री झाला. त्या वेळी जहाजावर सुमारे 48 हजार मेट्रिक टन नेप्था भरतानाचा ट्रान्सफर ऑपरेशन सुरू होता. प्राथमिक अहवालानुसार, स्फोटकांनी भरलेली चालकविरहित स्पीडबोट जहाजाच्या उजव्या बाजूला येऊन धडकली. या धडकेनंतर जहाजावर भीषण आग लागली. इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्ड्सने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून काही अहवालांनुसार हा हल्ला इराकच्या प्रादेशिक जलक्षेत्रात झाला. हल्ल्यानंतर जहाजावरील सर्व क्रू सदस्यांनी जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. इराकच्या कोस्ट गार्डने एसटीएस टीयुजीच्या मदतीने 27 जणांची सुटका केली. यात 15 भारतीय आणि 12 फिलिपीन्सचे नागरिक होते. सर्वांना बसरा बंदराजवळील एका छोट्या बेटावर सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले. भारतीय दूतावासाने सोशल मीडियाद्वारे याची माहिती देत मृत क्रू सदस्याच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. दूतावास इराकी अधिकाऱ्यांशी संपर्कात असून बचावलेल्या भारतीयांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे. आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू भारतीय शिपिंग मंत्रालय आणि भारतीय दूतावासाने या घटनेची दखल घेत पुढील तपास आणि मदतकार्य सुरू केले आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्शियन गल्फमध्ये दोन तेलवाहू जहाजांवर अंडरवॉटर ड्रोनच्या साहाय्याने हल्ला करण्यात आला. यामध्ये ‘सेफसी विष्णू’ आणि ‘झेफिरोस’ या जहाजांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका–इस्रायल–इराण संघर्षात आतापर्यंत किमान तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाल्याची पुष्टी झाली आहे. 12 मार्चपर्यंत या संघर्षाला 13 दिवस पूर्ण झाले असून परिस्थिती अद्याप तणावपूर्णच आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर