बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Sambhaji Nagar Crime News: इंटरनेटच्या अवाढव्य वापरामुळे माणसांचं आयुष्य सुखकर नक्कीच झालं असलं तरी त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होतो, हे सत्य नाकारता येत नाही. लहान मुलांच्या हातात देखील आता इंटरनेट असल्याने अनेकता मुलं पॉर्नोग्राफीच्या विळख्यात अडकतात. अशातच आता संभाजीगनरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून आलेल्या ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’च्या व्हिडिओंचा नाद एका तरुणाला महागात पडलाय. या तरुणावर गुन्हा नोंद झाला असून हा तरुण डी फार्मसीचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर येतीये.
तब्बल 490 चाईड पॉर्नोग्राफीचे व्हिडीओ…
अक्षय गायकवाड असं या 28 वर्षाच्या तरुणाचं नाव असून त्याच्यावर संभाजीनरगरच्या छावणी पोलिस ठाण्यात ‘पॉक्सो’ व ‘आयटी ॲक्ट’नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये चाईड पॉर्नोग्राफीचे व्हिडीओ मोबाईलमध्ये डाऊनलोड केले अन् मोठ्या प्रमाणात व्हिडीओ साठवून ठेवले. त्यानंतर त्याने हे व्हिडीओ इतरांना पाठवण्यास सुरूवात केली, अशी माहिती मिळाली आहे. चाईड पॉर्नोग्राफीचे तब्बल 490 व्हिडीओ या तरुणाच्या मोबाईलमध्ये सापडल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.
फोल्डर उघडल्यावर धक्काच बसला
सोशल मीडियावरील माहितीच्या आधारे संशयिताचा ‘आयपी ॲड्रेस’ आणि ई-मेल आयडी ट्रॅक करण्यात आला. त्यानंतर त्याला भावसिंगपुरा येथील घरातून ताब्यात घेतलं. आरोपीने हा सर्व डेटा त्याने पासवर्ड असलेल्या फोल्डरमध्ये लपवून ठेवला होता. पोलिसांनी फोल्डर उघडल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यानंतर आता सायबर पोलिसांनी आरोपीची चांगलीच शाळा घेतली.
चाईड पॉर्नोग्राफीसाठी कायदा काय?
कोणत्याही माध्यमामधून बाल लैंगिक शोषणाशी संबंधित व्हिडीओ शोधणं, पाहणं, डाउनलोड करणं, तयार करणं आणि शेअर करणं या सर्व बाबी ‘कलम ६७ बी’ अंतर्गत येतात. पहिल्या गुन्ह्यासाठी 5 वर्षांपर्यंतची कैद आणि 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड, तर दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी 7 वर्षांपर्यंतची कैद आणि 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाचे पोर्टल आणि सायबर सेल हे आंतरराष्ट्रीय संस्थांशी जोडलेले आहेत. एखादी व्यक्ती डार्क वेब किंवा टेलिग्रामवरून चाइल्ड पॉर्नोग्राफी डाउनलोड करते, तेव्हा त्या मोबाइलची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचते. त्यानंतर सायबर पोलीस कारवाई करत असते.