ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

दिवाळीआधी एकनाथ शिंदे ‘भाकरी’ फिरणार?:मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत; ‘ऑपरेशन टायगर’वरून संजय शिरसाटांचा मोठा गौप्यस्फोट

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


येत्या काही महिन्यांत शिवसेना (शिंदे गट) पक्षात आणि राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीपूर्वी आपल्या मंत्रिमंडळाची ‘भाकरी’ फिरवण्याच्या तयारीत असून, जे मंत्री पक्ष संघटना बळकट करण्यात अपयशी ठरले आहेत, त्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. त्यांच्या जागी राज्यमंत्र्यांची कॅबिनेट पदी वर्णी लागण्याची किंवा नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या सर्व चर्चांवर शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे. राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’बाबत मंत्री संजय शिरसाट यांनी महत्त्वाची विधाने केली आहेत. शिरसाट म्हणाले की, “ऑपरेशन टायगर केव्हा आणि कधी करायचे, याची पूर्ण कल्पना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. ज्या दिवशी गरज भासेल, त्या दिवशी हे ऑपरेशन यशस्वी होईल. आजही उद्धव ठाकरे गटाचे अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. ठाकरे गटाकडे आता ती ताकद उरलेली नाही, त्यामुळे हे परिवर्तन अटळ आहे.” काही निर्णय सांगून होत नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती आहे. याबाबत संजय शिरसाट यांना विचारले असता, “दिवाळीपूर्वी खांदेपालट होणार की शिंदे साहेब भाकरी फिरवणार हा निर्णय सांगून होत नाही तर जागेवर होतो. त्यामुळे दिवाळीनंतर एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे,” असे म्हणाले. आमदार महेश शिंदेंवर कारवाईची टांगती तलवार? सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या भूमिकेविरोधात काम केल्याचा आरोप असलेले आमदार महेश शिंदे यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “महेश शिंदे यांची काही विषयांवर नाराजी आहे, हे खरे आहे. दोन दिवसांपूर्वीच माझे त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांना आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन आपली भूमिका मांडण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, शिंदे साहेब त्यांना वेळ देणार का? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.” पक्षचिन्हावर आमचाच दावा! सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावरही शिरसाट यांनी भाष्य केले. “कुणी कुणालाही भेटले तरी आम्हाला फरक पडत नाही. धनुष्यबाण आणि पक्ष आमचाच आहे आणि तो आमच्याकडेच राहील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. हे ही वाचा… ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे थेट रुग्णालयात:राजकीय चर्चा, ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा चर्चेत राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आणणारी घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्नीची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. पल्लवी पाटील यांचा नुकताच अपघात झाला असून त्या सध्या उपचार घेत आहेत. ही माहिती मिळताच शिंदे यांनी मंगळवारी थेट मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालय गाठत त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर