ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मुंबईच्या प्रदूषणावर दीपिका पादुकोण आक्रमक:लहान मुलं गुदमरतायत…हे कसं योग्य असू शकतं? बीएमसीला थेट सवाल, सोशल मीडियावर चिंता व्यक्त

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शहरातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता सतत खालावत असल्याने नागरिकांना, विशेषतः लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे तिने नमूद केले. या परिस्थितीकडे लक्ष वेधत तिने महापालिका प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे. दीपिका पादुकोणने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ही चिंता व्यक्त केली. तिने मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा एक स्क्रीनशॉट शेअर केला असून त्यामध्ये हवेचा निर्देशांक (AQI) 150 च्या पुढे गेल्याचे दिसत आहे. हा स्तर आरोग्यासाठी धोकादायक मानला जातो. या पोस्टमध्ये तिनेबृहन्मुंबई महानगरपालिकेला टॅग करत शहरातील प्रदूषणाबाबत तातडीने चौकशी आणि उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. मुंबईत राहणारे लोक, विशेषतः लहान मुले, खराब हवेच्या गुणवत्तेमुळे गुदमरत आहेत. हे कसं योग्य असू शकतं? असा प्रश्नही तिने उपस्थित केला. दरम्यान, मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत आवाज उठवणारी दीपिका ही एकमेव अभिनेत्री नाही. याआधी अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि सैयामी खेर यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत मुंबईच्या खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली होती. शहरात वाढणारी धूळ, बांधकामे आणि वाहतुकीमुळे प्रदूषणाची समस्या गंभीर बनत असल्याचे अनेकांनी अधोरेखित केले आहे. ‘किंग’ या चित्रपटात दिसणार दीपिका पादुकोणच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच शाहरुख खानच्या पुढच्या ‘किंग’ या चित्रपटात दिसणार आहे. सुहाना खान, अभिषेक बच्चन, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, अर्शद वारसी, जयदीप अहलावत आणि राणी मुखर्जीचाही या चित्रपटात समावेश आहे. याशिवाय ती दिग्दर्शक ॲटली यांच्या एका तेलुगू अ‍ॅक्शन चित्रपटातही झळकणार असून त्या प्रोजेक्टमध्ये ती अल्लू अर्जुन सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर