ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

औंढा पोलिसांनी वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या:३ जेसीबी, ५ ट्रॅक्टरसह ८९.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त; १६ जणांवर गुन्हा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


औंढा नागनाथ तालुक्यातील रुपूर शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात पोलिसांंच्या पथकाने छापा टाकून तीन जेसीबी, पाच ट्रॅक्टर, पाच ब्रास वाळूसह ८९.१५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सोळा जणांवर सोमवारी ता. १९ पहाटे औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांना पाहताच फरार झालेल्या आरोपींची वाहनांच्या क्रमांकावरून नांवे शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वाळू घाटांवरून अवैधरित्या वाळूची वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभागाचे तर पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी पोलिसांचे पथक स्थापन केले आहे. या पथकांकडून दररोज वाळू घाटांवर जाऊन माहिती घेतली जात आहे. या शिवाय वाळू घाटावर जाणाऱ्या वाहनांची अचानक तपासणी करून कारवाई केली जात आहे. दरम्यान, औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, पोलिस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, जमादार माधव सुर्यवंशी, अमोल चव्हाण, तान्हाजी ढाकरे, विलास पाईकराव, राजकुमार कुटे, इजाज पटेल यांची दोन पथके रविवारी ता. १८ रात्री गस्तीवर होती. यावेळी रुपूर शिवारातून पूर्णा नदीच्या पात्रात जेबीसीच्या मदतीने वाळू उपसा करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून दोन्ही पथकाने रुपूर शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात जाऊन छापा टाकला. मात्र पोलिसांना पाहताच वाहनावरील सर्व जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. यामध्ये पोलिसांनी नदी पात्रातून तीन जेसीबी, पाच ट्रॅक्टर व पाच ब्रास वाळू असा ८९.१५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी सर्व मुद्देमाल पोलिस ठाण्यात आणला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक वाघमारे यांच्या तक्रारीवरून आठही वाहनांच्या चालक व मालकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी वाहनांच्या नोंदणीवरून वाहन मालकाचा शोध घेण्यास सुरवात केली असून वाहन चालक व मालकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके स्थापन करण्यात आली आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या गेल्या असून यामुळे आता अवैध वाळू उपसा व वाहतूकीला लगाम बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर