ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

भोंदूबाबाचा 13 वर्षीय मुलीवर अत्याचार:पालघर जिल्ह्यातील संतापजनक घटना; भोंदू नराधमांना कायद्याचा धाक नाही – रोहित पवार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पालघर जिल्ह्यातील एका भोंदूबाबाने औषध देण्याच्या बहाण्याने एका 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत राज्यात भोंदू नराधमांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचा आरोप केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चरी पावण परिसरात ही घटना घडली आहे. फिर्यादीच्या बहिणीची मासिक पाळी थांबत नव्हती. त्यामुळे गावठी औषध आणण्यासाठी त्याने भोंदू शिवराम परश सावर याच्या संपर्क साधला होता. त्यानुसार, आरोपी 3 मे रोजी स्वतः खुताडपाडा येथे पोहोचला. त्यानंतर त्याने फिर्यादीसह पीडित मुलगी, तिचे नातेवाईक व साक्षीदार यांना आपल्या इको कारमध्ये बसवून डहाणू तालुक्यातील चरी पावण परिसरात नेले. तिथे रात्री 11.30 च्या सुमारास आरोपीने पीडितेच्या नातेवाईकांना वाहनात थांबण्यास सांगितले. त्यानंतर औषध तयार करण्यासाठी 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला घेऊन तो रस्त्यालगतच्या जंगलात गेला. तिथे मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्याने तिच्याशी जबरदस्तीचे शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला पुन्हा तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. पीडित मुलीने घरी परतल्यानंतर हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ कासा पोलिस ठाण्यात धाव घेऊन भोंदू शिवराम सावर याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीवर पीडित कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. इगो बाजूला ठेवून महिला सुरक्षेचा विषय हाताळा – रोहित पवार दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा दाखला देत राज्यातील लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, राज्यात भोंदूबाबांकडून महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबायचं नाव घेईनात. आता पालघरमध्येही एका भोंदूने अघोरी पूजेसाठी बोलावून एका 13 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना पुढं आली. भडगाव (जळगाव) इथं 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बिबवेवाडीत 9 वर्षीय मुलीची छेडछाड, चाकणमध्ये 11 वर्षीय मुलावर अत्याचार तर गोंदियामध्ये 15 वर्षीय मुलीचा विनयभंग, केजमध्ये आजोबाकडूनच 3 वर्षीय नातीवर अत्याचार अशा विकृत आणि किळसवाण्या घटनांची मालिका रोज सुरूये. या भोंदू नराधमांना कायद्याचा कुठलाही धाक राहिला नाही. गुन्हा घडला की अटक आणि वर्षानुवर्षे सुनावणी, मात्र पुढं काहीच होत नाही. किती दिवस हे असंच चालू ठेवणार? गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी कायदा कुचकामी ठरत असेल तर तो बदललाच पाहिजे. सरकारने इगो बाजूला ठेवून महिला सुरक्षेचा हा विषय गांभीर्याने घेऊन तत्काळ आठवडाभरात विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा अमलात आणावा, ही विनंती, असे त्यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर