ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

निदा खानला MIM च्या नगरसेवकाने लपवले:पोलिसांची मतीन पटेल यांना नोटीस, मोबाईलही जप्त; 2 महिन्यांपूर्वीच खरेदी केला होता फ्लॅट

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकच्या बहुचर्चित टीसीएस धर्मांतर व लैंगिक शोषण प्रकरणातील एक आरोपी असणाऱ्या निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमच्या एका नगरसेवकाने लपवून ठेवले होते अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सदर नगरसेवकाला नोटीस बजावून त्याचा मोबाईलही जप्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची मूळे आणखी खोलवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिकमधील TCS प्रकरण समोर आल्यापासून पोलिस निदा खानच्या शोधात होते. ती गत 25 मार्चपासून फरार होती. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने तिचा शोध सुरू ठेवला होता. पण ती वारंवार आपले लोकेशन बदलत होती. तिचे जवळचे नातेवाईक तिला लपण्यासाठी मदत करत होते. याच काळात ती अटकपूर्व जामिनासाठीही प्रयत्न सुरू केला होता. पण कोर्टाने तिला कोणताही दिलासा देण्यास साफ नकार दिला होता. अखेर ती छत्रपती संभाजीनगर येथील एका घरात लपून बसल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी वेगवान कारवाई करत तिला बेड्या ठोकल्या. मतीन पटेल यांनी खरेदी केले नवे घर निदा खानला बेड्या ठोकल्यानंतर पोलिसांनी तिला आश्रय देणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. त्यात एमआयएमचे स्थानिक नगरसेवक मतीन पटेल यांनी तिला लपण्यासाठी मदत केल्याची बाब पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी मतीन पटेल यांना नोटीस बजावून त्यांचा मोबाईल जप्त केला आहे. विशेष म्हणजे निदा खान गत 5 दिवसांपासून संभाजीनगरमध्ये राहत होती. ती संपर्कात आल्यानंतर मतीन पटेल यांनी 2 महिन्यांपूर्वी नारेगाव येथील कौसर पार्क परिसरात एक नवे घर विकत घेतले होते. या घरात त्यांनी दिला ठेवले होते. पोलिसांना या गोष्टीची कुणकुण लागताच नाशिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांच्या एका संयुक्त पथकाने सलग 2 दिवस या घरावर पाळत ठेवली होती. तांत्रिक तपासात या घरात निदा खान असल्याची खात्री पटताच त्यांनी गुरुवारी रात्री या घरावर छापा टाकून निदा खानला अटक केली. तिच्या अटकेमुळे आता नाशिक धर्मांतर व लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. निदा खान प्रकरणात मतीन पटेल सहआरोपी दुसरीकडे, निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांना सहआरोपी केले आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याची पुष्टी केली आहे. निदा खानला अटक करण्यासाठी नाशिक शहर पोलिस व छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. निदा खानला संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. तिला तिथे स्थानिक नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पटेल यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. या कारवाईत आम्हाला सहकार्य केल्याबद्दल छत्रपती संभाजी नगर पोलिस आयुक्तांचे आभार मानतो, असे त्यांनी म्हटले आहे. निदा खानवर काय आहेत आरोप? निदा खान ही टीसीएस कंपनीत काम करत होती. तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव, मानसिक आणि लैंगिक छळ यांसारख्या अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच एका पीडित महिलेचे नाव बदलून तिला नोकरीच्या बहाण्याने मलेशियाला पाठवण्याचा कट रचल्याचाही आरोप तिच्यावर आहे. निदा खानविरुद्ध आतापर्यंत सुमारे 40 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात धर्मांतरासाठी होणारा फंडिंग नेमका कुठून येत होता आणि मालेगाव तसेच मलेशियातील रॅकेटशी तिचे काय संबंध आहेत? याचा उलगडा होण्याची शक्यता विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी व्यक्त केली. याच प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे. निदा खानच्या अटकेनंतर आता या रॅकेटमध्ये आणखी कुणाकुणाचा समावेश आहे, हे स्पष्ट होणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर