ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

मुंबईकरांना महागाईचा आणखी झटका! CNG दरात थेट 2 रुपयांची वाढ:वाहनचालक हैराण; सार्वजनिक वाहतुकीचं गणित बिघडणार

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई आणि उपनगरातील लाखो वाहनधारकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ जाहीर केली असून नवीन दर 84 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. ही वाढ 13 मेच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सीएनजीचे दर स्थिर होते, मात्र अचानक झालेल्या या दरवाढीमुळे रिक्षा, टॅक्सी चालकांसह मध्यमवर्गीय वाहनधारकांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई महानगर प्रदेशातील लाखो नागरिक रोजच्या प्रवासासाठी सीएनजीवर अवलंबून असल्याने या निर्णयाचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि आर्थिक कारणे जबाबदार आहेत. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. इराण आणि आसपासच्या भागातील संघर्षामुळे गॅस पुरवठा साखळीवर दबाव वाढल्याचे सांगितले जात आहे. देशांतर्गत उत्पादन अपुरे पडत असल्याने भारताला महागड्या आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने गॅस खरेदीचा खर्चही वाढला आहे. या सर्व कारणांचा परिणाम थेट सीएनजीच्या दरांवर झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या दरवाढीचा सर्वाधिक फटका सार्वजनिक वाहतूक क्षेत्राला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबईत सुमारे 4 लाख 70 हजार ऑटोरिक्षा आणि जवळपास 1 लाख 60 हजार टॅक्सी सीएनजीवर चालतात. रिक्षा संघटनांच्या मते, इंधन खर्च वाढल्यामुळे प्रति किलोमीटर परिचालन खर्चात सुमारे 1 रुपया 3 पैसे वाढ झाली आहे. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आगामी काळात भाडेवाढीचा प्रस्ताव प्रशासनाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय मुंबईतील ‘बेस्ट’ सेवा आणि राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसेस सीएनजीवर चालत असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या खर्चातही वाढ होणार आहे. मुंबईत 5 लाखांहून अधिक खासगी कारधारकांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सीएनजीचा पर्याय स्वीकारला होता. मात्र आता सीएनजी दरही सातत्याने वाढत असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी वाढू लागली आहे. स्वस्त आणि किफायतशीर इंधन म्हणून सीएनजीकडे पाहिले जात होते, पण वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे ही प्रतिमा धूसर होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. रोजच्या प्रवासासाठी सीएनजी वाहनांचा वापर करणाऱ्या मध्यमवर्गीयांना वाढीव खर्चाचा मोठा ताण सहन करावा लागणार आहे. प्रवासाचा खर्च आणखी वाढण्याची शक्यता दरम्यान, महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी अजूनही पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत स्वस्त असल्याचा दावा केला आहे. कंपनीच्या मते, सध्याच्या दरानुसार सीएनजी वापरल्यास पेट्रोलच्या तुलनेत सुमारे 44 टक्के आणि डिझेलच्या तुलनेत 7 टक्के बचत होत आहे. तरीही सतत वाढणाऱ्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. येत्या काही दिवसांत रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा निर्णय झाला, तर मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासाचा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर