ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सोलापूर – धुळे महामार्गावर कारचा भीषण अपघात:नियोजित वधू-वराचा जागीच मृत्यू; शैक्षणिक कामासाठी जात असताना घडली घटना

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


साखरपुड्यानंतर आपल्या शैक्षणिक कामासाठी एकेठिकाणी जाणाऱ्या नियोजित वधू – वराचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. या घटनेमुळे या जोडप्याचे लग्नाचे स्वप्न अधुरे राहिले असून, यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय शिनगारे (25) व इजोरा (हालमुक्काम वाशी) येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया चव्हाण (23) यांचा गत रविवारी (15 फेब्रुवारी) साखरपुडा झाला होता. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांत त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. त्यातच नववधू अक्षया हिची आज रविवारी लातूर येथे महापारेशनची परीक्षा होती. वधूच्या परीक्षेसाठी लातूरला जाताना अपघात या परीक्षेसाठी अक्षय व अक्षया हे कारने पहाटे वाशी येथून लातूरच्या दिशेने निगाले होते. सकाळी 6 च्या सुमारास रत्नापूर पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व कार भरधाव वेगात थेट येडशी टोलवेच्या कमानीला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, कारचा पुढील भागाचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. त्यात अक्षय व अक्षया या दोन्ही नियोजित वधू वराचा जागीच मृत्यू झाला. कारचालक गंभीर जखमी, उपचार सुरू या घटनेत चालक अक्षय सिरसाट (22) हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच रत्नापूर येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतील. त्यांनी जखमी चालकाला 108 रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी लगतच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील सोपस्कारासाठी येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. साखरपुड्यानंतर अवघ्या 4 दिवसांतच नियोजित वर-वधूचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण वाशी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर