ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

परभणी – हिंगोली विधान परिषद निवडणूक:चक्रव्यूव्हात सापडलेल्या अभिमन्यू खोतकर यांची अखेर माघार, बजोरीया यांचा मार्ग मोकळा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीमध्ये शिंदे सेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्या अभिमन्यू खोतकर यांनी अखेर उमेदवारीतून माघार घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुक वर पोस्टही टाकली आहे. उमेदवारीच्या चक्रव्युव्हा मध्ये सापडलेल्या अभिमन्यू यांनी माघार घेतल्याने विप्लव बाजोरिया यांचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी हिंगोली विधान परिषदेची जागा महायुतीकडून कोणी लढवायची याबाबत मोठा खल सुरू होता. राष्ट्रवादी, शिंदे गट व भाजपा यांच्याकडे जवळपास एकसमान मतदान असल्यामुळे या जागेवर राष्ट्रवादीने दावा सांगितला होता. त्यामुळे यावेळी उमेदवारी मिळणार की नाही याबाबत शंका निर्माण झाल्याने माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही भेट घेतली. जागा राष्ट्रवादीला सुटल्यास त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी या उद्देशाने त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेमध्ये परभणी हिंगोली ची जागा शिवसेनेला सुटणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या ठिकाणावरून माजी आमदार बाजोरिया यांच्यासह जालना येथील माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर यांनी उमेदवारीसाठी दावा केला होता. त्यानुसार खोतकर यांनी मतदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली होती. उमेदवारीसाठी शिंदे गटात रस्सीखेच सुरू झाल्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली होती. शिंदे सेनेच्या वरिष्ठ पातळीवर माजी मंत्री खोतकर व विप्लव बाजोरिया यांचे पिताश्री गोपीकिशन बाजोरिया यांचे चांगले वजन आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील नेते तसेच अर्थपूर्ण राजकारणासाठी प्रसिद्ध असलेले बाजोरिया यांच्या चक्रव्युहा मध्ये अभिमन्यू खोतकर सापडले होते. पक्षाचे अंतर्गत चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न अभिमन्यू यांनी केला मात्र त्यांना अपयश येत असल्याचे दिसू लागले होते. त्यानंतर अभिमन्यू खोतकर यांनी फेसबुक वर पोस्ट टाकून निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या शिंदे सेनेकडून विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. काय आहे फेसबुक पोस्टमध्ये विधान परिषद निवडणूक लढणार नाही : माननीय शिंदे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे साहेब आमदार अर्जुन खोतकर साहेब यांचा आदेश अंतिम. आपण सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार. सर्वांच्या साथीच्या जोरावर इथपर्यंत आलो आणि यापुढे ही वाटचाल अधिक बळकट आणि जोरदार राहील. धन्यवाद

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर