ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

झिशान सिद्दिकींच्या शपथेवरून राजकीय वादंग:इंग्रजीत शपथ म्हणजे शासनाला चपराक, मनसेची टीका; सिद्दिकींनी दिले स्पष्टीकरण

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विधान परिषदेच्या नवनियुक्त १० सदस्यांचा शपथविधी सोहळा आज विधान भवनात पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दिकी यांनी आज विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ इंग्रजीतून घेतली. सिद्दिकी यांनी मराठीतून शपथ न घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आणि मनसे आक्रमक झालेत. काही जण जाणून बुजून मराठी द्वेष्ठे असल्याचे दाखवतात, असे संजय शिरसाट म्हणालेत. तर झिशान सिद्दिकी यांनी इंग्रजीतून घेतलेली शपथ ही शासनाच्या कानाखाली चपराक असल्याचे मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी म्हटले आहे. या टीकेवर बोलताना मला मराठी येते, असे उत्तर झिशान सिद्दिकी यांनी दिले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक आणि पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या १० नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात दिमाखात पार पडला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या सर्व नवनियुक्त आमदारांना सदस्यत्वाची शपथ दिली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील महत्त्वाचे सदस्य उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी इंग्रजीमधून शपथ घेतल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. काय म्हणाले संजय शिरसाट? संजय शिरसाठ म्हणाले, काही लोक जाणून बुजून मराठीचा विरोध करून आम्ही कसे महाराष्ट्र द्वेष्ठे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला मराठी नाही बोलायचे, आम्हाला वंदे मातरम् नाही म्हणायचे, असा काही लोकांचा जो आग्रह आहे. तो सगळा चुकीचा आहे. लोक हे सर्व पाहत आहेत. निश्चित एक दिवस त्यांना त्यांची जागा पाहायला मिळेल. सिद्दिकींच्या इंग्रजी शपथेवर मनसेचा संताप मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी संताप व्यक्त केलाय. झिशान सिद्दिकी यांनी इंग्रजीतून घेतलेली शपथ ही राज्य शासनाच्या कानखाली चपराक आहे. कारण शिवसेना आणि भाजप ओरडून सांगतात की, आम्ही मराठीला प्राध्यान देतो. महाराष्ट्रात फक्त मराठी चालणार. रिक्षा चालवण्यासाठी मराठी सक्तीची केली. त्याच प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसमोर झिशान सिद्दिकी इंग्रजीत शपथ घेतात, यासारखे दुसरे दुर्दैव कोणते? असा सवाल योगेश चिले यांनी सरकारला केला. झिशान सिद्दिकींनी काय दिले स्पष्टीकरण? राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य झीशान सिद्दीकी म्हणाले, “मी गेल्या वेळी म्हणजेच जेव्हा मी २०१९ ची निवडणूक लढवली होती, तेव्हा कदाचित मी एकमेव असा सदस्य होतो, ज्याने इंग्रजी भाषेत शपथ घेतली होती. मी एक सुशिक्षित तरुण आहे आणि माझा असा विश्वास आहे की, इंग्रजी भाषेत शपथ घेणे ही एक चांगली गोष्ट आहे. गेल्या वेळीही मी इंग्रजीतच शपथ घेतली होती; त्यामुळे याविषयी फारसा विचार करण्यासारखे काहीच नाही. मी तेव्हाही तसे केले होते आणि या वेळीही मी तसेच केले आहे… मला असे वाटते की, एक देश म्हणून आपण जसजशी प्रगती करत आहोत, तसतसे प्रत्येकाला इंग्रजी बोलता आले पाहिजे. आणि मग कुणी इंग्रजी, हिंदी, मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेत शपथ घेतली, तरी त्या सर्व भाषा आपल्याच आहेत; त्यामुळे याविषयी फारसा विचार करण्याची काहीच गरज नाही.” भावूक आठवणी आणि आभार शपथविधीनंतर झिशान सिद्दिकी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. आज मी शपथ घेतल्यानंतर अजित पवार, माझे वडील यांचे स्मरण केले. सुनेत्रा वहिनींना धन्यवाद म्हटले. मला इतकी मोठी संधी दिल्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार मानतो. महाराष्ट्रासाठी काम करायचे आहे. अल्पसंख्यांक, वंचितांसाठी आवाज उठवायचा आहे. आज माझे वडील आणि अजित पवार असते, तर खूप आनंदीत झाले असते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर