ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

अल्पवयीन मुलीची दाेन लाखांत विक्री:मुली विकणारी टाेळी नाशकात अटकेत, नाशिक जिल्ह्यातील हरसूल येथील घटना

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आईचे छत्र हरपलेल्या 16 वर्षीय मुलीला मोबाईल आणि नविन कपडे घेऊन देण्याचे अमिष दाखवून तिचे नाशिक जिल्ह्यातील हरसूलनजीकच्या गावातून अपहरण करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर गावात तिचा बाल विवाह करून देण्यात आला. तेथील वरासाठी मुलगी शोधून देण्याकरिता 2 लाखांची दलाली घेतलेला संशयित आणि पतीसह 10 संशयितांना हरसूल पोलिसांनी अटक केली. तुषार पाचपिंड (29), संदीप पाचपिंड (40), सुरेश नवसु फसाळे, कमल सुरेश फसाळे, सीता पुंडलिक बेंडकोळी, ठकुबाई लक्ष्मण माळेकर, धर्मा नवसू माळेकर, सोन्याबापू बाळकृष्ण पाटोळे, विशाल नारायण परचंडे, महादेव साहेबराव नाईकवाडे अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबात जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरसूल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून 16 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पित्याकडून देण्यात आली होती. याप्रकरणात पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल होता. परिसरातून एकही तरुण बेपत्ता नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे अपहरण करण्यात येऊन या मुलीची विक्री करण्यात आली असावी असा संशय होता. पथकाने तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे मुलीचा माग काढला असता ती संगमनेर तालुक्यात असल्याचे लक्षात आले. हरसूल पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन मुलीला ताब्यात घेतले.अधीक्षक डॉ. डी.एस स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जीवन बोरसे सुनील आहेर,अनिल गांगुर्डे, सुनील ठाकरे, यांच्या पथकाने ही कारवाई केली. तिच्या चौकशीत बालविवाहासाठी तिला विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. फोन पे ने घेतली दलाली संशयित सुरेश फसाळे, कमल फसाळे (दोघे रा. गंगाम्हाळूंगी), ठकुबाई माळेकर (रा.वेळे, तालुका त्र्यंबकेश्वर), सोन्याबापू पाटोळे, विशाल परचंडे, महादेव नाईकवाडे (तिघे रा. संगमनेर) या दलालांनी या अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यासाठी फोन पेच्या माध्यमातून 2 लाख रुपये दलाली घेतली. धर्मा फसाळे, सीता बेंडकोळी यांनी आईचा आधार गमावलेली ही मुलगी शोधण्यास मदत केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. विवाह जमविण्यासाठी मुली विकण्याच्या आंतरजिल्हा टोळीतील हे संशयित असल्याने तपास सुरू आहे. एक महिना अत्याचार हरसूल येथून ही मुलगी 29 एप्रिल 2026 रोजी बेपत्ता झाली. 4 मे रोजी तिचे लग्न लावण्यात आले.पोलिसांनी गावातील फसाळे कुटुंब लग्न जमवण्याचे काम करत असल्याने ते कुणाच्या संपर्कात होते याची माहिती काढत मुलीची सुटका केली. पतीने या मुलीवर महिनाभर अत्याचार केल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाल्याने त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर