ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

भाजप सरकारला जनतेच्या खिशाची नाही, तर उद्योगपतींच्या तिजोरीची जास्त काळजी:तेल आयात करून परदेशात का विकले जातेय?- विजय वडेट्टीवार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जनतेला पेट्रोल डिझेल कमी वापरा म्हणून उपदेश करणाऱ्या सरकारने, तेल कंपन्यांना निर्यात कमी करा, असं सांगायची हिंमत का दाखवली नाही? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वडेट्टीवार यांनी कडाडून टीका केली आहे. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, 1 लाख 32 हजार कोटींचं कच्चं तेल आयात करायचं, त्यातील 52 हजार 876 कोटींचं तेल परदेशात विकायचं आणि मग देशातील नागरिकांच्या खिशातून महाग पेट्रोल डिझेलच्या नावाखाली पैसे वसूल करायचे. म्हणजे नफा कंपन्यांचा आणि लूट सामान्य माणसाची. भारतीय जनता पार्टी सरकारला जनतेच्या खिशाची नाही तर उद्योगपतींच्या तिजोरीची जास्त काळजी आहे, हे पुन्हा स्पष्ट झालं, असे म्हणत भाजपवर टीका केली आहे. सरकार मोजक्या लोकांसाठी काम करते? विजय वडेट्टीवार म्हणाले की, स्वतःच्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी देशभक्तीच्या घोषणा दिल्या जातात आणि दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाला अक्षरशः पिळलं जातं.जनतेला गाडी कमी चालवा सांगणाऱ्यांनी आधी कंपन्यांचा लोभ कमी करावा. नाहीतर हे सरकार जनतेसाठी नसून काही मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी चालतंय, हा संशय आता विश्वासात बदलायला वेळ लागणार नाही, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला आहे.

पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा- पीएम मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर आजच कमी केला पाहिजे. शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. या जागतिक संकटाचा भारतावर विशेष परिणाम झाला आहे, कारण आपल्याकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत. आज आपल्याला ‘वर्क फ्रॉम होम’ सारख्या उपायांची गरज आहे. ज्या शहरांमध्ये मेट्रो आहे, तेथील लोकांनी तिचा वापर केला पाहिजे.वाहनांचा अनावश्यक वापर कमी करा, मेट्रोने प्रवास करा आणि कारपूलिंग करा. या मार्गांवर शक्य तितक्या जास्त लोकांना घेऊन प्रवास करा.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर