ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी आज सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना जास्त पसंती:शिवसेना आमदार बच्चू कडूंचा मोठा दावा, म्हणाले- थेट जनतेच्या दरबारात जाऊ!

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रात आज जरी कोणी मुख्यमंत्रिपदासाठी सर्व्हे केला, तरी जनतेच्या मनातून केवळ एकनाथ शिंदे यांचेच नाव समोर येईल. त्यांच्या सर्वसामान्यांशी असलेल्या बांधिलकीमुळेच मलाच काय, तर अवघ्या महाराष्ट्राला ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. यासाठी देवाला साकडे घालण्याची गरज नाही, आम्ही आता थेट जनतेलाच साकडे घालू, असे शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यावर झालेल्या पोलिस कारवाईचा बच्चू कडू यांनी तीव्र निषेध केला. लोकशाहीत आंदोलन करणे म्हणजे गुन्हा नाही. राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्यावर कारवाई करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करण्यात यावे, अशी मागणी कडू यांनी केली आहे. तसेच, आम्ही या लढ्यात शेट्टी आणि जानकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला घरचा आहेर दिला. जातीपातीच्या आंदोलनात सहभागी होणार नाही बच्चू कडू म्हणाले की, मी आता कोणत्याही जातीपातीच्या आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आणि विकलांग (दिव्यांग) हे सर्वच जातींमध्ये असतात. त्यामुळे कोणत्याही एका विशिष्ट जातीच्या चौकटीत न अडकता, व्यापक विचार ठेवून मी यापुढे केवळ शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठीच लढणार आहे. मंत्रालयावर आंदोलनाचा इशारा काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला की, राज्यातील दिव्यांग आणि नेत्रहीन बांधवांना मिळणारे ‘संजय गांधी निराधार योजने’चे मानधन गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की, सरकारने दिव्यांगांच्या आर्थिक मदतीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा; अन्यथा रखडलेल्या अनुदानासाठी दिव्यांगांच्या वतीने मंत्रालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर