ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

भाजपमध्येच मतभेद उघड? सोमय्यांच्या विरोधाला भाजपमधूनच धक्का?:कुर्बानीच्या पत्रामुळे नेत्यावर पक्षाची कारवाईची टांगती तलवार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुर्बानीच्या मुद्द्यावरून भाजपमध्येच नवा वाद निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. काही दिवसांपासून सोसायट्यांमध्ये बकऱ्यांची कुर्बानी देण्यास विरोध करणारे भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक भूमिका घेत होते. अनेक ठिकाणी या मुद्द्यावरून वादही झाले. घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीमध्येही किरीट सोमय्या यांनी जाऊन कुर्बानीला विरोध दर्शवला होता. मात्र, याच प्रकरणात आता एक धक्कादायक बाब समोर आल्याने भाजपच्या स्थानिक संघटनेत खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सागर पार्क सोसायटीकडून कुर्बानीसाठी परवानगी मागण्यात आली होती. विशेष म्हणजे या पत्रावर स्वाक्षरी करणारे व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून भाजपचे ईशान्य मुंबईतील प्रमुख पदाधिकारी चंद्रकांत मालकर असल्याचे समोर आले आहे. चंद्रकांत मालकर हे सोसायटीचे सचिव म्हणून कार्यरत असून त्याचबरोबर भाजपच्या संघटनात्मक जबाबदारीतही महत्त्वाच्या पदावर आहेत. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी विसंगत वाटणाऱ्या या घडामोडीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कुर्बानीसाठी परवानगी मागणाऱ्या पत्रातील स्वाक्षरी आणि त्यानंतर समोर आलेल्या माहितीमुळे भाजप नेतृत्वानेही याची गंभीर दखल घेतली आहे. किरीट सोमय्या यांनी या संपूर्ण प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत चंद्रकांत मालकर यांना पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या भूमिकेला धक्का पोहोचेल असे कोणतेही पाऊल का उचलण्यात आले, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा वाद आता केवळ सोसायटीपुरता मर्यादित न राहता पक्षांतर्गत चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणानंतर भाजपच्या ईशान्य मुंबई विभागाकडूनही हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हाध्यक्ष दीपक दळवी यांनी चंद्रकांत मालकर यांच्याकडून अधिकृत खुलासा मागितला आहे. परवानगी मागण्यामागील नेमके कारण काय होते, ती प्रक्रिया कोणत्या भूमिकेतून करण्यात आली आणि पक्षाच्या भूमिकेशी त्याचा संबंध काय, याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता मालकर यांचा खुलासा काय असणार, याकडे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. भाजप तसेच काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कुर्बानीच्या मुद्द्यावर भाजप तसेच काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक भूमिका घेत होत्या. सोसायट्यांमध्ये अशा प्रकारच्या धार्मिक कृतींना परवानगी देऊ नये, अशी मागणी अनेक ठिकाणी करण्यात आली होती. घाटकोपरमधील सागर पार्कमध्येही याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विरोध नोंदवला होता. त्यामुळे त्याच सोसायटीच्या व्यवस्थापनाकडून परवानगीसाठी अर्ज करण्यात आल्याचे समोर येणे हे पक्षासाठी अस्वस्थ करणारे ठरत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर