ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

आठ लाखांचे आमिष देत सोशल मीडियावर गर्भाशय भाड्याने देण्याचे रॅकेट:चॅटिंग, कॉलवरून होतो सौदा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोशल मीडियावरून सरोगसीचे रॅकेट चालत असल्याची धक्कादायक बाब ‘दिव्य मराठी’ च्या स्टिंगमधून पुढे आली आहे. विवाहितांनाच नव्हे तर अविवाहित युवतींनाही सोशल मीडियावर घेरतात. त्यांना बेंगळुरू, कोलकाता, हैदराबादला बोलावतात. ७ ते ८ लाखांचे आमिष दाखवून त्यांचे गर्भाशय अवैधरीत्या भाड्याने घेतले जाते. मग सरोगेटला बेंगळुरू, कोलकाता, दिल्ली, मुंबईसह गुजरातमध्ये नेतात. आरोग्य तपासणीनंतर स्पर्म्स सोडतात. नंतर ते सांगतील तिथेच राहावे लागते. पेमेंट पद्धत : गर्भधारणा ते प्रसूतीपर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे रिलीज केले जातात गर्भधारणेवेळी १० टक्के रक्कम दिली जाते. त्यानंतर बाळाच्या हृदयाचे ठोके निश्चित झाल्यावर १०% तर पुढील ५ महिने ५० टक्के रक्कम विभागून दरमहा दिली जाते. उर्वरित ३० टक्के रक्कम प्रसूतीनंतर दिली जाते. याचे कुठलेही कागदोपत्री पुरावे नसतात. सरकारी रुग्णालयांची संमती आवश्यक कायद्यामुळे तरी आता बंधने आली आहेत. पूर्वी तर अवैध सरोगसी सर्रास होत असे. नियमानुसार आयव्हीएफ सेंटर्सने सरकारी रुग्णालयांची संमती घेणे बंधनकारक आहे. शिवाय गर्भधारणा होऊ शकत नाही हे सिद्ध करावे लागते. एकदाच सरोगसी करता येते. -डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख, स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ, शासकीय वैद्यकीय व रुग्णालय, संभाजीनगर आधी फ्रेंड रिक्वेस्ट, मग कॉल करतात इंडिया सरोगसी-इनटेडेंट पॅरेंट अँड सरोगेट ग्रुप, एग्ज डोनेशन अँड सरोगसी ग्रुप इन इंडिया, सरोगसी इन इंडिया, सरोगसी, एग्ज डोनेशन अँड स्पर्म डोनेशन इन द यूएसए, स्पर्म डोनेशन इंडिया, डू यू नीड सरोगसी मदर, स्पर्म डोनेशन पुणे, स्पर्म डोनेशन कोलकाता, स्पर्म डोनेशन बेंगळुरू, सरोगेट मदर इन इंडिया, हेल्प मी फाइंड सरोगसी असे २५ पेक्षा अधिक ग्रुप आहेत. आधी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, मग कॉल करतात. कायद्यानुसार १० वर्षांचा तुरुंगवास सरोगसी (नियमन) कायदा- २०२१ चे कलम ३८ व ३९ नुसार सरोगेटला मोबदला म्हणून पैसे देणे बेकायदा आहे. जर कुणी व्यक्ती, आयव्हीएफ सेंटर असा व्यवसाय करत असेल आणि सरोगसीतून जन्मलेल्या अपत्यांची विक्री करत असेल तर कायद्यानुसार १० वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. शिवाय १० लाखांपर्यंतचा दंडही आकारला जाऊ शकतो.
निशा शर्मा: सरोगेट एकटीच हवी
प्रतिनिधी : पैसे किती मिळू शकतील?
दलाल : सरोगेटच्या प्रोफाइलवर रेट ठरत असतो. आधीच सांगत नसतात.
प्रतिनिधी : मला १० लाख हवेत.
दलाल : ५ ते ८ लाखच मिळतील. सरोगेटला बेंगळुरूला आमच्या घरी राहावे लागेल. खर्च आम्ही करू.
प्रतिनिधी: मी पत्नीसोबत राहू शकतो का?
दलाल : अजिबात राहता येत नाही. सरोगसीनंतर मातेला कर्नाटकमधील उडपी शहरात प्रसूतीपर्यंत ठेवले जते.
प्रतिनिधी : ॲडव्हान्स मिळेल का?
दलाल : नाही, आम्ही रेल्वे तिकीट काढून देतो किंवा खर्च भरून देतो. वंदना राव: प्रसूतीपर्यंत थांबावे
दलाल : तुमच्याकडे सरोगेट मदर आहे का? वय किती आहे?
प्रतिनिधी : हो आहे, २८ वय आहे. पैसे किती मिळतील ते सांगा.
दलाल : ६ लाख देऊ. प्रोफाइल पाहिल्यावर त्यात वाढ होऊ शकते.
प्रतिनिधी : मला १० लाखांचे कर्ज फेडायचे आहे. तेवढी रक्कम द्या.
दलाल : एवढे नाही मिळू शकणार. जास्तीत जास्त ७ लाख मिळतील.
प्रतिनिधी : सरोगसीची प्रक्रिया महाराष्ट्रात होईल की बाहेर राज्यात?
दलाल: नाही, बेंगळुरूला यावे लागेल. प्रसूती होईपर्यंत येथेच थांबणे अनिवार्य. सरोगसीची वैध पद्धत :
१. मूल होत नसलेल्या जवळच्या नातेवाइकांनाच सरोगेट मदर करता येते.
२. सरोगेटसोबत कायदेशीर करार केला जातो. आई-वडिलांचे शुक्राणू काढून सरोगेटच्या गर्भाशयात सोडतात.
३. प्रसूती झाल्यावर मूल दिले जाते. पण तत्पूर्वी सरोगेटचा ३६ महिन्यांचा वैद्यकीय विमा काढतात.
४. गर्भधारणेदरम्यानचा पौष्टिक आहार आणि प्रवासाचा खर्च दिला जातो.
५. सरोगसी पैसे कमावयचे साधन नाही. असे करणाऱ्यांना कलम ४० नुसार ५ वर्षे शिक्षा, ५ लाखांचा दंड होतो. सरोगसीची अवैध पद्धत : १. गरजूंना घेरून आधी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. रिक्वेस्ट स्वीकारल्यावर मेसेंजरवर कॉल करतात.
२. सरोगसीला तयार असलेल्यांची सोशल मीडियाच्या विविध अकाउंटवरून अनेकदा उलटतपासणी केली जाते.
३. स्त्रीबीज देणार की सरोगसी करणार हे कॉल करून विचारतात. पूर्ण प्रोसेसही समजावून सांगतात.
४. वय, रक्तगट, उंची, वजन, मासिक धर्माची माहिती फोटोसह अपलोड करायला लावतात.
५. बेंगळुरू, हैदराबाद, कोलकात्याला बोलावून आरोग्य तपासणी होते. मग प्रसूतीपर्यंत उडपी शहरात ठेवतात.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर