ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

शिवबंधन बांधून किंवा शपथा घेऊन माणसं टिकत नाहीत:उद्धव ठाकरेंची पक्षावर पकडच नाही, राऊतांनाही अनेकदा ‘मातोश्री’वर प्रवेश मिळत नाही- नवनाथ बन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उद्धव ठाकरे यांची त्यांच्या पक्षावर पकड नाही. त्यामुळे त्यांनी बोलावून सुद्धा पक्षाच्या बैठकीला कोणी येत नाही. त्यांनी सोडून जा म्हटले किंवा नाही यामुळे काही फरक पडत नाही. मविआचे सरकार असताना यांचे आमदार निघून गेले तेव्हाही ते असेच बोलत होते. कारण उद्धठ ठाकरेंच्या सांगण्यावर कोणी थांबणार नाही आणि येणार सुद्धा नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे अडीच वर्षे सरकार असताना आमचे देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना अनेक खोट्या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आमचा साधा एकही नगरसेवकसुद्धा तुम्ही फोडू शकला नाहीत. ईडी, सीबीआय तुमच्या हातात दिले तरी तुम्ही काही करू शकणार नाही. यंत्रणेच्या दबावामुळे जर लोकप्रतिनिधी फुटले असते तर काँग्रेस आणि मविआचे राज्य कधी गेलेच नसते.

माणसं टिकवण्यासाठी प्रेम-आपुलकी लागते नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी उबाठाच्या बैठकीत खासदारांनी शपथा घेतल्या की आम्ही उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही असा दावा केला आहे. पण राऊत विसरले आहेत की शपथा घेऊन आणि शिवबंधन बांधून माणसं टिकत नाहीत. खासदार आणि आमदार टिकवण्यासाठी प्रेम आणि आपुलकीचे बंधंन लागते, हे उबाठाने लक्षात घेतले पाहिजे. हे काहीच उद्धव ठाकरेंकडे उरलेले नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे नेते इतर पक्षात जात आहेत हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. खासदार तुमच्यासोबत राहणार नाही, कारण तुमच्याकडे बाळासाहेबांचे विचार राहिलेले नाही. राऊतांना अनेक वेळेस मातोश्रीवर प्रवेश मिळत नाही नवनाथ बन म्हणाले की, मातोश्रीचे दरवाजे कायम बंद असतात. उद्धव ठाकरे हे लोकप्रिय नेते आहे सांगणे म्हणजे या दशकातील सर्वात मोठा विनोद आहे. तुम्ही दरवाज्यापर्यंत आलेल्या माणसांना मातोश्रीमध्ये प्रवेश देत नाही. राऊतांनादेखील अनेक वेळेस मातोश्रीवर प्रवेश मिळत नाही. तुमच्या हाती यंत्रणा दिली तरी तुमच्यासोबत एकही माणूस टिकणार नाही, कारण तुमच्याकडे आपलेपणा नाही. मुळात नरेंद्र मोदी गुजराजतचे मुख्यमंत्री असताना त्यांची 12-12 तास सीबीआयकडून चौकशी करण्यात आली आहे. अमित शहा यांना गुजरातमधून तडीपार करण्यापर्यंत मजल गेली होती पण ना अमित शहा यांनी पक्ष सोडला ना नरेंद्र मोदींनी.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर