ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

नसरापूर अत्याचारप्रकरणी 14 दिवसांत 1100 पानी दाेषाराेपपत्र काेर्टात दाखल:मुख्यमंत्र्यांकडून दरराेज आढावा, शंभरहून अधिक फुटेजची तपासणी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणाने महाराष्ट्र हादरला असताना एसआयटीने तातडीने तपासाची चक्रे फिरवत १४ दिवसांत तपास पुर्ण केला आहे. या पार्श्वभूमीवर विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी ११०० पानांचे दोषारोपपत्र पुणे विशेष न्यायालयात दाखल केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये एसआयटीने सलग १२ दिवस रात्रंदिवस तपास केला. अ‍ॅड. मिसर यांनी तपासी पथकासोबत समन्वय साधत तांत्रिक पुराव्यांची भक्कम मोट बांधली. त्यासाठी तब्बल १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले आणि भक्कम पुराव्यांच्या आधारे हे दोषारोपपत्र तयार करण्यात आले आहे. उच्च न्यायालय आदेशान्वये विशेष न्यायालयात सुनावणी या गुन्ह्याची तीव्रता आणि समाजातील संताप पाहता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एका विशेष न्यायालयात हा खटला चालवला जाणार आहे. येत्या सोमवार (१८ मे) खटल्याची नियमित सुनावणी सुरू होत आहे. अवघ्या १४ दिवसांत सखोल तपास करून दोषारोपपत्र दाखल केल्यामुळे आता न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल. अ‍ॅड. मिसर यांच्या अनुभवाचा या खटल्यात मोठा फायदा होणार असून पीडितेला लवकर न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर