ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

गणेश नाईक कद्रू मनाचे अन् अल्पसंतुष्ट, ते भाजपचे निष्ठावंत नाहीत:एक दिवस नवी मुंबईच्या राजकारणातून संपतील- शहाजीबापू पाटील

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नवी मुंबईतील एका शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिकेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे शिवसेना नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. शिवसेना नेते शहाजीबापू पाटील यांनी भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर शेलक्या शब्दांत घणाघाती टीका केली आहे. गणेश नाईक हे कद्रू मनाचे आणि अल्पसंतुष्ट माणूस आहेत, असा टोला लगावतानाच त्यांनी नाईकांना त्यांच्या भूतकाळातील राजकारणाची आठवण करून दिली. शहाजीबापू पाटील म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमात पालकमंत्र्यांचे किंवा मुख्यमंत्र्यांचे नाव असण्याची साधनसुचिता पाळलीच पाहिजे. ‘मी आणि माझी नवी मुंबई, मी इथला राजा’ ही नाईकांची भावना लोकशाहीत चालणार नाही. एक दिवस गणेश नाईक हे नवी मुंबईच्या राजकारणातून पूर्णपणे संपलेले दिसतील. 1997 मध्ये मनोहर जोशी यांचे युती सरकार पाडण्यासाठी त्यांनी शरद पवारांशी संपर्क साधला होता, असा गंभीर आरोपही बापूंनी केला.

उबाठा गुवाहाटीच्या धक्क्यातून सावरलेली नाही शहाजीबापू पाटील म्हणाले की, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी पक्षांतराचा निर्णय दिल्लीत घेतला आहे. त्यामुळे मुंबईत नारळाच्या झाडाखाली बसून काल्पनिक विधाने करणे राऊतांनी बंद करावे. औरंगजेबाला जिकडे-तिकडे संताजी आणि धनाजी दिसायचे, तशीच अवस्था आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची झाली असून त्यांना स्वप्नातही फक्त एकनाथ शिंदेच दिसत आहेत. हे नेते अजूनही गुवाहाटीच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत; परंतु येत्या काही दिवसांत संपूर्ण ‘उबाठा’ पक्ष एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आल्याशिवाय राहणार नाही. सोलापुरात महायुतीचाच विजय होणार शहाजीबापू पाटील म्हणाले की, मोहिते-पाटलांचे राजकारण आता पूर्णपणे विरघळले असून त्यात कोणताही दम उरलेला नाही. तर वसंत देशमुख हे साधे-सरळ माणूस असून त्यांनी या राजकीय भानगडीत पडायला नको होते. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि त्यांचे छुपे मित्र एकत्र येऊन राजेंद्र राऊत यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास शहाजीबापूंनी व्यक्त केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर