ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

नीट प्रकरण:पुण्यात तिसरी कारवाई, बॉटनीच्या प्राध्यापिकेला अटक, मॉडर्न कॉलेजमध्ये 24 वर्षांपासून कार्यरत मनीषा मांढरे पेपरफुटीत सूत्रधार

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नीट पेपर फुटीप्रकरणी पुण्यातील मॉडर्न कॉलेजात २४ वर्षांपासून इयत्ता ११, १२ वीला बॉटनी विषय शिकवणाऱ्या आणि नीट परीक्षेच्या पेपर सेटर प्रा. मनीषा गुरुनाथ मांढरेला दिल्लीतून अटक करण्यात आली. लातूरचे केमिस्ट्रीचे पेपर सेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी, पुण्यातील ब्यूटिशियन व्यावसायिक मनीषा वाघमारे यांच्याशी हातमिळवणी करून तिने बॉटनी (वनस्पतीशास्त्र), झुऑलॉजी (प्राणिशास्त्र) विषयाचे प्रश्न फोडून काही विद्यार्थ्यांना दिल्याचा दावा सीबीआयने केला आहे. कुलकर्णी, वाघमारेला १० दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रा. मांढरे ६ महिन्यांनी निवृत्त होणार होत्या. सीबीआयच्या पथकाने शनिवारी मांढरेंच्या घरी कागदपत्रांची तपासणी तसेच त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली. गेल्या २४ तासांत सीबीआयने देशभरात ६ ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात एकूण ९ जणांना अटक झाली असून त्यातील ५ जण महाराष्ट्रातील आहेत. पुण्यातून याआधी धनंजय लोखंडे, मनीषा वाघमारेला अटक झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने एनटीए म्हणजे परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेच्या संचालकपदी भारतीय सांख्यिकी सेवेतील १९९८-बॅचच्या अधिकारी अनुजा बापट, भारतीय महसूल सेवेच्या २००४-बॅचच्या अधिकारी रुचिता विज यांची पाच वर्षांसाठी सहसचिवपदी, भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आकाश जैन, भारतीय लेखापरीक्षण अधिकारी आदित्य राजेंद्र भोजगढिया यांची सहसंचालकपदी नियुक्ती केली. वाघमारे-मांढरे एकाच सोसायटीत रहिवासी सूत्रांनी सांगितले की, पेपर सेटर असल्याने मांढरेला बॉटनी, झुऑलॉजीच्या प्रश्नपत्रिकांची पूर्ण माहिती, अ‍ॅक्सेस मिळाला होता. त्याचा त्यांनी फायदा घेतला. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या मनीषा वाघमारे आणि मांढरे पुण्यात एकाच सोसायटीत राहतात. लातूर येथून अटक केलेले प्रा. प्रल्हाद कुलकर्णींसोबत त्यांनी प्रश्नपत्रिका फोडण्याचे कारस्थान केले. ६ वर्षांपासून पेपर सेटर होत्या मांढरे मांढरे सहा वर्षांपासून एनटीएमध्ये प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम करत होत्या. त्यांनी बॉटनी, झुऑलॉजीचे प्रश्न काही विद्यार्थ्यांना घरी शिकवणीसाठी बोलावून दिले, अशी माहिती सीबीआयच्या तपासात समोर आली आहे. मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे यांनी सांगितले की, एनटीएकडून मांढेरेंना प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी ईमेलवर माहिती येत होती. त्या सुट्टी घेऊन कुठे प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी जात होत्या याची कल्पना नाही. त्यांचे काम गोपनीय असल्याने त्याबाबत कोणती विचारणादेखील आम्ही करू शकत नव्हतो. आता त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. सीबीआयच्या तपासात समोर आले की, एप्रिल अखेरीस मांढरेने पुण्यातील ब्यूटिशियन मनीषा वाघमारेच्या मदतीने काही विद्यार्थ्यांसाठी स्वत:च्या घरी विशेष कोचिंग क्लासेस घेतले. त्यात काही प्रश्न लिहून पाठ्यपुस्तकात खुणाही करून दिल्या. ३ मे रोजी झालेल्या प्रत्यक्ष परीक्षेतील बहुतांश प्रश्न मांढरेने दिलेल्या प्रश्नांशी तंतोतंत जुळले. सीबीआय पथकाने मनीषा वाघमारे पती संजय वाघमारे यांच्या बिबवेवाडीतील डेन्टल क्लिनिकवर छापा टाकला. तेथून सीसीटीव्ही फुटेज जप्त केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर