ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

गद्दार बदलले, चेहरे बदलले… पण विचार नाही:वर्धापनदिनानिमित्त मुंबईत ठाकरे गटाचे पोस्टर चर्चेत, फुटीच्या पार्श्वभूमीवर दिला राजकीय संदेश

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, पक्षाच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत उबाठा गटाने मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टर्समधून पक्षाने आपल्या विचारधारेचा आणि राजकीय वारशाचा पुनरुच्चार करत विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ‘गद्दार बदलले, चेहरे बदलले… पण विचार नाही’ मुंबईतील विविध भागांत लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरील एक संदेश विशेष चर्चेत आला आहे. “गद्दार बदलले, चेहरे बदलले… पण विचार नाही!” असा मजकूर या पोस्टर्सवर झळकताना दिसत आहे. राजकीय वर्तुळात या संदेशाचा संबंध 2022 मध्ये झालेल्या आमदारांच्या बंडाशी आणि आता सहा खासदारांनी घेतलेल्या भूमिकेशी जोडला जात आहे. पक्ष फुटला, नेते बदलले, अनेक पदाधिकारी गेले, तरी शिवसेनेची मूळ विचारधारा बदललेली नाही, असा संदेश या पोस्टर्समधून देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. 60 वर्षांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख वर्धापनदिनानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनर्स आणि होर्डिंग्जमध्ये शिवसेनेच्या सहा दशकांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करण्यात आला आहे. पक्षाची स्थापना, मराठी अस्मितेची चळवळ, हिंदुत्वाची भूमिका आणि महाराष्ट्रातील राजकारणातील योगदान यावरही या पोस्टर्समधून प्रकाश टाकण्यात आला आहे. मुंबईतील प्रमुख चौक, रस्ते आणि पक्षाच्या शाखांजवळ हे बॅनर्स लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. फुटीनंतर कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न? गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’मुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. लोकसभेतील नऊपैकी सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत वर्धापनदिनाच्या निमित्ताने विचारधारेचा मुद्दा पुढे करून कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा आणि संघटना एकसंध असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न उबाठा गटाकडून होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. दुसरीकडे शिंदे गटाचाही मोठा मेळावा वर्धापनदिनाच्या दिवशीच मुख्यमंत्रीपदावरून बंड करून वेगळी शिवसेना स्थापन करणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ यांच्या गटाकडूनही मुंबईत मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ‘जनात शिवसेना, मनात शिवसेना’ अशा घोषवाक्यांसह शिंदे गटानेही मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या दिवशी दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शनाचे चित्र पाहायला मिळत आहे. वर्धापनदिनाला राजकीय संघर्षाची किनार एकीकडे खासदारांच्या फुटीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, तर दुसरीकडे दोन्ही गट आपापल्या शिवसेनेलाच खरी वारसदार असल्याचे सांगत आहेत. अशा पार्श्वभूमीवर उबाठा गटाने लावलेले “गद्दार बदलले, चेहरे बदलले… पण विचार नाही” हे पोस्टर केवळ वर्धापनदिनाची शुभेच्छा नसून, सध्याच्या राजकीय संघर्षाला दिलेले थेट उत्तर म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत लागलेली ही पोस्टर्स आणि त्यातून दिलेले राजकीय संदेश सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. संबंधित बातमी वाचा… ‘अखंड शिवसेना, अटळ हिंदुत्व’!:मशाल गायब, उद्धव ठाकरेंचाही फोटो नाही; बंडू जाधवांच्या पोस्टमधून स्पष्ट झाले नवे राजकीय संकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या दिवशी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये अनेक राजकीय संकेत दडलेले असल्याचे मानले जात आहे. वाचा संपूर्ण बातमी षण्मुखानंदमध्ये उबाठा गटाचा वर्धापन दिन सोहळा:6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष, बंडखोर आणि भाजप रडारवर?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व उलथापालथ सुरू असतानाच, आज (१९ जून) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ६० वा वर्धापन दिन सोहळा सायन येथील ऐतिहासिक ‘षण्मुखानंद सभागृहात’ पार पडत आहे. ऐन वर्धापन दिनाच्या तोंडावर पक्षाच्या ६ खासदारांनी ‘व्हिप’ धुडकावून दिलेल्या हुलकावणीमुळे ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. असे असले तरी, या संकटाचा धैर्याने सामना करत पक्षाकडून या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून, राज्यभरातून निष्ठावान शिवसैनिकांचे जथ्थे मुंबईत दाखल होत आहेत. वाचा संपूर्ण बातमी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर