ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

नीट पेपरफुटीचे जाळे नागपूरपर्यंत:नांदेड कनेक्शनमध्ये असलेला ‘आलोक’ CBIच्या रडारवर, मोटेगावरच्या मुलालाही घेतले ताब्यात

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट-यूजी २०२६’ (NEET-UG) पेपरफुटी घोटाळ्यात आता नागपूर कनेक्शन समोर आहे. या रॅकेटचा नांदेड पॅटर्न तपासताना सीबीआयच्या रडारवर आता नागपूर येथील ‘आलोक’ नावाचा संशयित मास्टरमाइंड आला आहे. या आलोकनेच किमान एक हजार विद्यार्थ्यांना नीटचा पेपर विकल्याचा दाट संशय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला आहे. दुसरीकडे, याच प्रकरणात रविवारी रात्री उशिरा लातूरच्या नामांकित ‘आरसीसी क्लासेस’चे (RCC) संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने पुण्यातून अटक केली असून, विशेष न्यायालयाने त्याला ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. तर मोटेगावरच्या मुलालाही चौकशीसाठी सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. कोण आहे नागपूरचा ‘आलोक’? नीट घोटाळ्याच्या तपासात नागपूरच्या ‘आलोक’ या गूढ नावाभोवती आता सीबीआयचा फास आवळला जात आहे. सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत समोर आलेले त्याचे कारनामे थक्क करणारे आहेत. आलोकने देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील जवळपास १ हजार विद्यार्थ्यांपर्यंत थेट किंवा दलालांमार्फत पेपर पोहोचवल्याचा संशय आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी आलोकने अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना पुण्यात बोलावून घेतले होते. तेथेच गोपनीय ठिकाणी ठेवून त्यांना पेपर रटवून घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आलोक हा नागपुरातील कोणत्या मोठ्या रॅकेटचा हिस्सा आहे की तो स्वतःच मुख्य सूत्रधार आहे, याबाबत सीबीआयने गोपनीयता पाळली असून त्याचा कसून शोध सुरू आहे. नांदेडच्या महिलेकडून आलोकचे नाव समोर सीबीआयच्या मुंबईतील महानिरीक्षक हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे सीबीआयचे तपासप्रमुख विनोद चौधरी यांनी नुकतीच नांदेडमध्ये धाड टाकली होती. नीट पेपरफुटी प्रकरणात नांदेडमधील हॉटेल व्यावसायिक कदम परिवाराची चौकशी केली असता ‘आलोक’चे नाव समोर आले. नांदेडच्या विद्युतनगरमधील अश्विनी कदम नावाच्या महिलेने आपल्या मुलीसाठी तब्बल ५ लाख रुपयांना नीटचा पेपर खरेदी केला होता. यासाठी २५ हजार रुपये ऑनलाईन टोकन मनी म्हणून दिले गेले. त्यानंतर आलोकने या मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना १५ दिवस पुण्यात एका ठिकाणी थांबवून ठेवले आणि तिथेच तिला प्रत्यक्ष पेपर दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मोटेगावकरच्या मुलाचीही CBI चौकशी सुरू दरम्यान, नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी मुख्य संशयित शिवराज मोटेगावकर यांना अटक केल्यानंतर, आता सीबीआयने (CBI) त्यांच्या मुलालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मोटेगावकर यांनी आपल्या मुलाला परीक्षेत बेकायदेशीर फायदा मिळवून देण्यासाठी पेपरफुटीच्या जाळ्याचा वापर केल्याचा दाट संशय तपास यंत्रणांना आहे. या पार्श्वभूमीवर, विविध आर्थिक व्यवहार आणि तांत्रिक दुव्यांची कसून पडताळणी केली जात आहे. सध्या शिवराज मोटेगावरच्या मुलाची पुण्यातील सीबीआय कार्यालयात चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, अधिकृत पातळीवर CBI कडून याबाबत कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही. तसेच, तपास सुरू असल्याने चौकशीतील अनेक बाबी गोपनीय ठेवण्यात आल्या आहेत. कोचिंग क्लासेसचे संचालक फरार; प्राध्यापिका निलंबित दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढताच नांदेडमधील अनेक नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांचे धाबे दणाणले आहेत. सत्र संपल्याचे कारण पुढे करत अनेक क्लासेसने आपली कार्यालये घाईघाईने बंद केली आहेत, तर काही संशयित संचालक शहरातून फरार झाले आहेत. दरम्यान, याच प्रकरणात पुण्यातून अटक झालेल्या मॉडर्न कॉलेजच्या जीवशास्त्र (Biology) विषयाच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्यावर महाविद्यालय प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. २००२ पासून कार्यरत असलेल्या मांढरे यांचे निलंबन १६ मेपासून लागू करण्यात आल्याचे परिपत्रक कॉलेजने काढले आहे. एनटीए प्रमुखांना संसदेचे समन्स; २१ मे रोजी होणार चर्चा नीट पेपरफुटीच्या वाढत्या वादामुळे आता केंद्र सरकार आणि परीक्षा घेणारी ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTA) अडचणीत आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संसदीय स्थायी समितीने एनटीएचे अध्यक्ष प्रदीप कुमार जोशी आणि शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट समन्स बजावले आहे. येत्या २१ मे २०२६ रोजी संसदेत या विषयावर हाय-प्रोफाइल बैठक होणार असून एनटीए प्रमुखांना यावर स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचे तीव्र पडसाद ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात ‘आरसीसी’ क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने अटक करताच राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी खाजगी क्लासेस परिसरातील मोटेगावकरांच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या नामफलकावर काळी शाई फेकून तीव्र निषेध व्यक्त केला. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये AIMIM च्या वतीने कोकणवाडी येथील मोटेगावकर यांच्या RCC क्लासेस समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतिकात्मक स्वरूपात RCC Classes च्या फलकांवर काळे फासण्यात आले. नांदेडमध्ये छावा विद्यार्थी आघाडी व SFI कडून संताप नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ सोमवारी नांदेड शहरात देखील विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. छावा विद्यार्थी आघाडीच्या वतीने वर्कशॉप कॉर्नर येथे निदर्शने करत शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी पेपरफुटी प्रकरणातील NEET पेपर फोडल्या संदर्भात संशयितांच्या छायाचित्रांना काळी शाई फासून निषेध नोंदविण्यात आला. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर एसएफआयच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर