ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

ढोलक्याचीवाडी शिवारातील मगरीची ताडोबाच्या बफर क्षेत्रात सुटका:वन विभागाच्या पथकाने पहाटेच पाण्यात सोडले

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याचीवाडी शिवारातील शेतात आढळून आलेल्या मगरीची ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील तलावात बुधवारी ता. २४ पहाटे सुटका करण्यात आली आहे. मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर वन विभागाच्या पथकाने सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याचीवाडी शिवारात आनंदराव फटींग यांचे शेत आहे. त्यांच्या शेतापासून काही अंतरावरच इसापूर धरण असून एक छोटा कालवा देखील आहे. या पाण्याचा ऊसासाठी वापर केला जातो. मागील काही दिवसांपासून त्यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरु आहे. आज सकाळी कामगार ऊस तोडणी करीत असतांना त्यांना ऊसाच्या फडात मोठी हालचाल जाणवली. कामगारांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता तेथे जिवंत मगर आढळून आली. गावकरी व वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन मगर ताब्यात घेतली. सदर मगरीला ईसापूर धरणात सोडू नये अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. त्यानंतर विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून मार्गदर्शन मागविले होते. त्यावरून मगरीची तपासणी करून तिला ताडोबाच्या बफर क्षेत्रात नैसर्गिक अधिवासात साेडण्यास परवानगी दिली होती. त्यावरून वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल शिवरामकृष्ण चव्हाण, वनपाल सारंग शिंदे, शिवाजी काळे, सुधाकर कऱ्हाळे, संग्राम भालेराव, शेख सिद्दीक यांच्या पथकाने रातोरात ताडोबा प्रकल्प गाठला. त्यानंतर आज सकाळच्या सुमारास मगरीची पाण्यामध्ये सुटका केली. मगरीचा पिंजरा उघडताच पाण्याचा प्रवाह पासून मगर सुखरुपपणे पाण्यात गेली. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर