ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

ओबीसींनी पवारांना त्यांची जागा दाखवली:भुजबळ-मुंडेंना दूर ठेवणे भोवले, पुण्यातील पराभवावरून लक्ष्मण हाकेंचा काका-पुतण्याला टोला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या पीछेहाटीवरून ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी पवार काका-पुतण्यांवर जोरदार प्रहार केला आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथे माध्यमांशी बोलताना हाके यांनी केवळ पवारांनाच नव्हे, तर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनाही ‘नतदृष्ट’ म्हणत लक्ष्य केले. “पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील २७ महानगरपालिकांमध्ये शरद पवारांच्या पक्षाला साधा नारळही फोडता आला नाही आणि अजित पवारांनाही तुटपुंजे यश मिळाले. ओबीसींना डावलून जरांगे पाटलांना साथ देणाऱ्यांना ओबीसी बांधवांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे,” अशा जळजळीत शब्दांत ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. भुजबळ-मुंडेंना दूर ठेवणे भोवले अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या कामगिरीवर बोलताना हाके म्हणाले की, छगन भुजबळ यांना प्रचारापासून दूर ठेवणे आणि धनंजय मुंडे यांना बाजूला करून बजरंग सोनवणे व क्षीरसागर यांना जवळ करणे अजितदादांना महागात पडले आहे. ओबीसी बांधवांनी हे सर्व जवळून पाहिले असून त्याचेच प्रतिबिंब निवडणुकीच्या निकालात उमटले आहे. “माने या न माने, पण ओबीसींनी आता पवारांना नाकारले आहे,” असा दावा त्यांनी केला. आरक्षण संपलंय, आता तरी जागं व्हा! पुणे महानगरपालिकेतील आकडेवारीचा दाखला देत हाके यांनी खळबळजनक दावा केला. “पुण्यामध्ये ४१ ओबीसी जागांपैकी ३० ते ३२ जागांवर मराठा-कुणबी उमेदवारांनी निवडणुका लढवून विजय मिळवला आहे. याचाच अर्थ ओबीसींचे आरक्षण आता केवळ कागदावर उरले असून प्रत्यक्षात ते संपले आहे,” असे ते म्हणाले. तिकीट देताना केवळ ‘निवडून येण्याची क्षमता’ पाहून गुंड आणि धनदांडग्यांना प्राधान्य दिले जाते, अशी टीकाही त्यांनी अजित पवारांवर केली. गिरीश महाजन नतदृष्ट आहेत प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याबद्दल लक्ष्मण हाके यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा कडक शब्दांत निषेध केला. “ज्या महामानवाने देशाला संविधान दिले, त्या बाबासाहेबांचे नाव घेण्याची जर तुम्हाला लाज वाटत असेल, तर महाजन तुम्ही ‘नतदृष्ट’ आहात. तुम्ही पालकमंत्री म्हणून मिरवायच्या आणि मंत्रिमंडळात काम करायच्या लायकीचे नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. भाजपने संविधानाची पायमल्ली सुरू केली असून, पक्ष फोडणे लोकांना विकत घेणे हे असे करत आहेत. जे पोटामध्ये आहे ते तुमच्या ओठावर आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुम्ही ते दाखवून दिले, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर