ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

श्रीकांत शिंदे-चिखलीकरांच्या भेटीने नांदेडच्या राजकारणात खळबळ:मध्यरात्री हॉटेलमध्ये रंगली गुप्त बैठक; भाजपची धाकधूक वाढली

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच नांदेडमध्ये झालेल्या एका गुप्त बैठकीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात मध्यरात्री एका हॉटेलमध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर महायुतीतील अंतर्गत समीकरणांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, नांदेडच्या राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जागावाटप, उमेदवारी आणि पक्षीय गणितांवरून महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जोरदार खलबतं सुरू आहेत. अशा परिस्थितीत कल्याण-डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे नांदेड दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांची हॉटेलमध्ये जाऊन भेट घेतल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या गुप्त चर्चेमुळे आगामी निवडणुकांमध्ये नवे राजकीय समीकरण तयार होणार का, याची चर्चा आता रंगू लागली आहे. नांदेड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत भाजपविरोधात प्रयोग केला होता. त्याच धर्तीवर विधानपरिषद निवडणुकीतही पुन्हा अशीच राजकीय युती पाहायला मिळणार का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. महायुतीमध्ये जागावाटपावरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याने तिच्याकडे राजकीय निरीक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे. विशेषतः भाजपला कोंडीत पकडण्यासाठी नवा फॉर्म्युला आखला जात असल्याची चर्चा नांदेडच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, प्रताप पाटील चिखलीकर यांनी या बैठकीबाबत प्रतिक्रिया देताना पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असे स्पष्ट केले. पक्षाने सांगितले तर निवडणूक लढणार नाही, मात्र सर्व पक्षांशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याबाबत विचारले असता, अद्याप त्यांच्याशी याबाबत चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ही जागा आपल्या मुलासाठी नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मागत असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही अंतर्गत वाद नाही राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचेही प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले. देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्ष बळकटीसंदर्भात चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सुनील तटकरे यांना पक्षातील काही गैरसमज झाले होते, त्यावर त्यांनी बैठकीत खुलासा केला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही अंतर्गत वाद नसल्याचेही चिखलीकर यांनी स्पष्ट केले. मात्र, मध्यरात्री झालेल्या या बैठकीने नांदेडच्या राजकारणात नव्या चर्चांना निश्चितच खतपाणी घातले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर