ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

महामार्गावर उभ्या वाहनांमधून डिझेल चोरणारी टोळी गजाआड:”एलसीबी”कडून सिनेस्टाईल पाठलाग करत चार जणांना केली अटक‎

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नगर-मनमाड राज्य महामार्गावर रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांमधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. राहुरी तालुक्यातील गुहा आणि राहुरी फॅक्टरी परिसरात १८ मे रोजी रात्री पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत चार दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेली कार आणि डिझेलसह २ लाख १५ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर डिझेल चोरीचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल तनपुरे, रमीजराजा आत्तार, प्रकाश मांडगे व उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक रात्री गस्त घालत होते. काटवनातून आवळल्या मुसक्या रात्री ११ वाजेच्या सुमारास राहुरी ते कोल्हार रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार (एमएच १७ बीडी ९७७१) संशयास्पदरीत्या फिरत असून, त्यातील इसम डिझेल चोरीच्या तयारीत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. पोलिसांनी गुहा परिसरात सदर कारला थांबण्याचा इशारा केला असता, चालकाने गाडी सुसाट वेगाने राहुरीच्या दिशेने पळवली. पोलिसांनी पाठलाग सुरू ठेवल्याने आरोपींनी राहुरी फॅक्टरी शिवारातील बालाजी ढाब्याजवळ गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत काटवनात पळ काढला. मात्र, पोलिसांनी चपळाईने पाठलाग करून चौघांना जेरबंद केले. पोलीस कॉन्स्टेबल भगवान थोरात यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अटक केलेले आरोपी आणि फरार साथीदार पोलिसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये करण राजू ऊर्फ राजेंद्र साळुंखे (रा. नांदुर्खी रोड, शिर्डी), सनी ऊर्फ सल्ल्या राजेंद्र पवार (रा. सावळीविहीर, ता. राहाता), जितेन्द्र रोहिदास वाघमारे (रा. पिंपळस, ता. राहाता) आणि प्रणव दिलीप चौधरी (रा. नांदुर्खी रोड, शिर्डी) यांचा समावेश आहे. दरम्यान, त्यांचा पाचवा साथीदार निलेश मोकळ हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर