ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

गुंड गजा मारणेच्या पत्नीला राष्ट्रवादीची उमेदवारी:पुण्यातील गुंडगिरी संपवण्याची भाषा करणाऱ्या अजित पवार यांच्या भूमिकेवर सवाल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. गजा मारणे एका प्रकरणात सध्या तुरुंगात आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीने त्याच्या पत्नीला उमेदवारी दिल्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात त्याचे मोठे राजकारण होण्याची शक्यता आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांची लगबग वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिली आहे. जयश्री मारणे यांना प्रभाक क्रमांक 10 मधून उमेदवारी यासंबंधीच्या माहितीनुसार, जयश्री मारणे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 10 मधून अधिकृत उमेदवार असतील. त्यांना पक्षाने एबी फॉर्मही दिला आहे. जयश्री मारणे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गजा मारणे सध्या कोथरूडमधील एका दुचाकीस्वाराला मारहाण केल्याप्रकरणी तुरुंगात बंदिस्त आहे. हा दुचाकीस्वार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करत होता. त्याला गजा मारणे याच्या टोळीने बेदम मारहाण केली होती. त्यानंतर गजा मारणे याच्यासह त्याच्या काही सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. अजित पवारांचे गुंडगिरीला पाठबळ? अजित पवारांनी एका कार्यक्रमात पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पुण्यातील कोयता गँग बंद करण्याची सूचना केली होती. आम्ही तुमच्यासाठी पोलिसांची संख्या वाढवली. तुम्ही आता गुन्हेगारी आटोक्यात आणण्यावर भर द्या, असे ते म्हणाले होते. पण आता अजित पवारांचा पक्षच एका गुंडाच्या पत्नीला उमेदवारी देत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कुख्यात गुंड गजा मारणेवर खंडणी, दहशत, खून यासारखे अनेक गुन्हे आहेत. गजा मारणेच्या घरी मध्यंतरी काही नेत्यांनी भेटही दिली होती. आता पुन्हा त्याच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने गुंडांना राजकीय पाठबळ दिले जात आहे का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांना उमेदवारी दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने रुपाली पाटील यांना प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी दिली आहे. पक्षाने त्यांना एबी फॉर्मही दिला आहे. काही दिवसांपूर्वी रुपाली ठोंबरे पाटील यांनी राष्ट्रवादीच्याच आपल्या सहकारी तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर त्यांनी अजित पवारांची भेट घेत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. आता राष्ट्रवादीने महापालिका निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिल्यामु्ळे हा वाद संपल्यात जमा असल्याचे मानले जात आहे. दीपक मानकरांचे दोन्ही मुले मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक मानकर यांची दोन्ही मुले पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत. एकाला भाजपने तर दुसऱ्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. दोन्ही पक्षाकडून मुलांना उमेदवारी मिळाल्याने आता दीपक मानकर नेमका राष्ट्रवादीचा प्रचार करणार की भाजपचा? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर