ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

घोडेगावात डिझेल टंचाईमुळे शेतीची मशागत खोळंबली:इंधनासाठी शेतकऱ्यांच्या रांगा, डिझेल उशिरा मिळत असल्याने नांगरणीला लागतोय ब्रेक‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गेल्या दोन दिवसांत लागू झालेल्या इंधन दरवाढीचा थेट फटका नेवासा तालुक्यातील घोडेगाव आणि परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसला आहे. दरवाढीपाठोपाठ सुरू झालेल्या तीव्र डिझेल टंचाईमुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतीची मशागत पूर्णपणे खोळंबली असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. रविवारी (१७ मे) डिझेल आणि पेट्रोलची दरवाढ लागू झाली. मात्र, पंपांवर साठा उपलब्ध असतानाही नवीन दरांचे “सेटिंग’ करण्याच्या नावाखाली अनेक पेट्रोल पंप रविवारी दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर पंप सुरू होताच काही तासांतच डिझेल संपल्याने वाहनधारकांना रिकाम्या हाताने परतावे लावले. सोमवारी (१८ मे) दुपारनंतर परिसरातील केवळ एकाच पंपावर डिझेल उपलब्ध झाल्याने शेतकरी आणि वाहनधारकांनी डिझेल खरेदीसाठी प्रचंड गर्दी करत लांबच लांब रांगा लावल्या होत्या. मंगळवारीही सकाळी डिझेल आले, पण ते घेण्यासाठी पंपांवर रांगा लागल्या होत्या. सध्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाले असून, पेरणीपूर्व मशागतीची बहुतांश कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जातात. पारंपरिक पद्धतीने बैलांद्वारे मशागत करणे आता शेतकऱ्यांना आर्थिक व व्यावहारिकदृष्ट्या परवडणारे राहिलेले नाही. मात्र, ऐन गरजेच्या वेळी पंपांवर डिझेलच मिळत नसल्याने ट्रॅक्टर चालक हतबल झाले आहेत. डिझेलअभावी ट्रॅक्टर उभे असल्याने शेतातील नांगरणी, रोटर आणि मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण न झाल्यास पेरण्या लांबण्याची आणि शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मशागतीचे दर १० टक्क्यांनी वधारले इंधन दरवाढीचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादन खर्चावर झाला आहे. डिझेल महागल्याने वाहतूक भाड्यात वाढ झाली आहेच, सोबतीला शेती मशागतीचे दरही वाढले आहेत. ट्रॅक्टर चालकांनी मशागतीच्या दरात साधारण १० टक्के दरवाढ केली. पूर्वी एकरी नांगरणीसाठी १८०० रुपये लागायचे आता यात वाढ होऊन ते २ हजारांपर्यंत गेले. तर शेती साहित्य किंवा इतर वाहतुकीसाठी पूर्वी घोडेगाव ते सोनई ३०० रुपये घेतले जायचे. त्यात ५० रुपये वाढ झाली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर