ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

भिजत घोंगडे:26 वर्षांत 8 शिक्षणमंत्री, तरीही कोचिंग क्लासेस नियंत्रणाचा कायदा कागदावरच

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नीट पेपरफुटी प्रकरणात खासगी कोचिंग क्लासेसचा सहभाग उघड झाल्यानंतर या क्लासेसवरील नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. राजस्थान, दिल्ली आणि बिहारसारख्या राज्यांनी खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कायदे लागू केले आहेत. मात्र, महाराष्ट्रात वर्ष २००० मध्ये तत्कालीन शिक्षण राज्यमंत्री अनिल देशमुख यांनी काढलेला अध्यादेश तब्बल २६ वर्षांनंतरही केवळ कागदावरच धूळ खात आहे. गेल्या अडीच दशकांत राज्याला ८ नवे शिक्षणमंत्री मिळाले, परंतु एकाही मंत्र्याला या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करता आलेले नाही. सध्या इतर राज्यांमधील कायद्यांचा अभ्यास करून नवीन मसुदा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती विद्यमान शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. या काळात झालेले शिक्षणमंत्री वसंत पुरके
राधाकृष्ण विखे पाटील
राजेंद्र दर्डा
विनोद तावडे
आशिष शेलार
वर्षा गायकवाड
दीपक केसरकर
दादा भुसे (सध्या). शाळा-कॉलेजचे नियम क्लासेसनाही लागू करा न्यताप्राप्त महाविद्यालये आणि क्लासचालक यांच्यातील छुपे ‘साटेलोटे’ पेपरफुटीच्या मुळाशी आहे. शाळा-महाविद्यालयांना जे कडक नियम लागू आहेत, तेच नियम खासगी क्लासेसनाही बंधनकारक करावेत सरकारने त्यांची फी निश्चित करावी.
– अनिल देशमुख, माजी शिक्षणमंत्री अध्यादेशाचा रखडलेला प्रवास २००० साली कायदा करण्यासाठी अध्यादेश काढला. त्यानंतर २०१८ मध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कायद्याचा मसुद्यासाठी १२ सदस्यीय समिती स्थापन केली होती. मात्र, काही घटकांच्या विरोधामुळे हा मसुदा तसाच मागे पडला. या काळात शालेय शिक्षण खात्याची धुरा ९ मंत्र्यांनी सांभाळली, पण कायदा झाला नाही. गुजरात (२०२४) क्लासची रीतसर नोंदणी सक्तीची, शिक्षकांसाठी पदवीधर असण्याची अट, इमारतीचे ‘स्ट्रक्चरल आणि फायर सेफ्टी’ हमीपत्र बंधनकारक. कायद्याचा मसुदा तयार करत आहोत खासगी क्लासेसच्या नियंत्रणासाठी कायद्याचा मसुदा तयार करत आहोत.पावले उचलली असून, लवकरच याचे कायद्यात रूपांतर होईल. -दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री नियंत्रण कायद्यामुळे शैक्षणिक समस्या सुटतील

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर