ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

कुणीही एकत्र येऊ द्या, भाजपला फरक पडणार नाही:मुंबईत भाजपचाच महापौर बसेल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरे बंधूंना टोला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कुणीही एकत्र आले तरी त्याचा भाजप व महायुतीवर कोणताही परिणाम पडणार नाही. मुंबईत भाजपचाच महापौर बसेल, असा ठाम विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईसह राज्यभरातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय युतीची घोषणा करणार आहेत. यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. विशेषतः ठाकरे बंधूंच्या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलेल असाही दावा केला जात आहे. पण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र हेटाळणीच्या सूरात कुणीही एकत्र आले तरी त्याचा भाजपला काहीही फरक पडणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे. 51 टक्के मुंबईकर भाजपला कौल देतील चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे विकासाचे मॉडेल लोकांपुढे मांडले आहे, त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नगरपालिका निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब दिसले. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवण्याचे काम फडणवीसांनी केले. त्यांनी 2047 पर्यंत मुंबई कशी असेल? या आधारावर मुंबईचा विकास प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे मुंबईकर आपली 51 टक्के मते महायुतीच्या बाजूने देतील. त्यातून पुन्हा एकदा महायुतीच्या माध्यमातून भाजपचा महापौर मुंबईच्या गादीवर बसेल. फडणवीसांनी मुंबईचा खरा विकास केला ते पुढे म्हणाले, मुंबईकर कोण कुणाशी युती करतो याकडे लक्ष देत नाही. मुंबईकर विकासाच्या बाजूने आहेत. जनतेला विकास हवा आहे. त्यामुळे दुसरीकडे, भकास आहे आणि आमच्याकडे विकास आहे. त्यामुळे कुणीही एकत्रित आले तरी त्यांना मते मिळणार नाही. तुमच्याकडे विकासाची भावना नाही. त्यांचा या शहरावर 25 वर्ष महापौर होता. तेव्हा त्यांनी या शहराच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. पण 2014 मध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने मुंबईचा विकास झाला. जगातील कोणताही व्यक्ती इथे आला तर त्याला बदललेल्या मुंबईचा चेहरा दिसत आहे.

जनतेला ठाकरेंची नौटंकी कळली बावनकुळे यांनी यावेळी राज व उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मुंबई शहराला विकासाच्या दिशेने पुढे नेण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही. कितीही नेते एकत्र आले, गळाभेट घेतली तरी काहीही होणार नाही. जनता त्यांच्यापासून फार दूर गेली आहे. जनतेला त्यांची नौटंकी कळली आहे. त्यांनी कितीही भाषणातून नौटंकी केली, तर जनता विश्वास ठेवणार नाही. त्यांना फक्त विकासाचे व्हिजन मांडावे लागेल. दरम्यान, महायुतीत बैठक सुरू आहे. आमच्यात कुठेही वाद नाही. महाराष्ट्रात सगळीकडे युती होणार आहे. बंडखोरी करणारा भाजपा-शिवसेनेचा कार्यकर्ता नाही. कुठल्याही परिस्थिती बंडखोरी होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. आमचा कार्यकर्ता समजूतदार आहे त्यामुळं बंडखोरी होणार नाही असंही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर