ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

‘जल जीवन’चा बोजवारा!:हिंगोलीच्या नांदूरा येथील महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा; 24 मेपासून उपोषणाचा इशारा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली तालुक्यातील नांदूरा येथे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी महिलांनी गुरुवारी ता. 21 दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे अन्यथा तीन दिवसानंतर कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. हिंगोली तालुक्यातील नांदूरा येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे कामे झाले आहे. मात्र सदरील काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाले असून गावात पाणीही येत नाही तर गावात केवळ सहा इंच ते एक फुट खोलीवर जलवाहिन्या अंथरण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला आहे. गावात नळ योजना असूनही महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. जल जीवन मिशन योजने अंतर्गत संपूर्ण गावात नळ पाणी पुरवठा सुरु करावा अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. दरम्यान, गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी शोभाबाई जाधव, सिता धोतरे, आशा धोतरे, संगिता जाधव, रंभाबाई शिंदे, रेखा शिंदे, लता कांबळे, सुदेशना कांबळे, संगिता कांबळे, नंदाबाई कांबळे, इंदीराबाई कांबळे, अलका कांबळे, अनुपमा कांबळे, पिंकू कांबळे, रुखमाबाई जाधव, मनीषा कांबळे यांच्यासह महिलांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडामोर्चा काढला. गावात पिण्यासाठी पाणी नसल्याने महिलांची भर उन्हात पाण्यासाठी भटकंती होत असून गावात तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे अन्यथा ता. २४ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर