ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

धार्मिक मुद्द्यांमुळे राज्य अशांत होईल:मनपात विकासाऐवजी धर्मावर चर्चा झाल्यास दरी निर्माण होईल, सरकार निवडणुकीपुरते आश्वासन देऊन मराठा आरक्षण विसरते- शशिकांत शिंदे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महापालिकेमध्ये जर विकासाचे मुद्दे बाजूला सारले जात असतील तिथे धार्मिक मुद्दे पुढे येत असतील तर महाराष्ट्र अशांत होण्यास काही वेळी लागणार नाही. कुणी काय करावे हा त्यांचा निर्णय आहे, सरकारने कायदा आणावा किंवा काहीही करावे आम्ही त्यावर चर्चा करावे पण राज्यात दरी निर्माण होऊ नये याची काळजी घेणं गरजेचे आहे, कायद्यापेक्षा लोकांच्या मनात परिवर्तन आणले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. तर मालेगाव सारख्या घटना कशा घडणार नाही यासाठी काही तरी करणे गरजेचे आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील आणि सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सातत्य ठेवले पाहिजे. सातत्य राहिले तरच त्यावर निर्णय होईल. निवडणुकीपुरते सरकार त्यांना आश्वासान देते आणि नंतर विसरते. हैदराबाद, सातारा गॅझेटचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा झालेला आहे, तेव्हापासून ते झाले नाही हे दुर्दैवी आहे. सभागृहात मुद्दा मांडणार शशिकांत शिंदे म्हणाले की, अजित पवार विमान अपघात संदर्भात काल मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि आमचे पदाधिकारी गेले होते त्यांनी गुन्हा दाखल करण्याची विंनती केली होती. आज ते बारामतीमध्ये जाऊन गुन्हा दाखल करण्याची विंनती करणार आहे. सभागृहात सुद्धा आम्ही मुद्दा मांडणार असून स्थगन किंवा इतर माध्यमातून सरकारला स्पष्टीकरण द्यायला लावू. ब्लॅक बॉक्स बद्दल माहिती नाही शशिकांत शिंदे म्हणाले की, अजित पवार यांच्या विमान अपघातामधील ब्लॅक बॉक्स बद्दल माहिती नाही, त्यावर फक्त चर्चा होत आहे, त्याबद्दल काही माहिती दिली जात नाही. काही जण म्हणताय की ब्लॅक बॉक्स जळाला आहे, काही जण म्हणताय सुरक्षित आहे, या वावड्यावर काहीतरी निर्णय घेणं गरजेचे आहे. अपघात प्रकरणी VSR वर एफआयआर दाखल करत कारवाई करावी त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे ही मागणी आहे. यात चुकीचे असे काहीच नाही कुणी त्याचा चुकीचा अर्थ लावू नये. आता यावर पोलिस आणि गृहखाते काय करते हे आम्हाला बघायचे आहे. मविआची चर्चा सुरू शशिकांत शिंदे म्हणाले की, राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या एका जागेसाठी आमची चर्चा सुरू आहे. सभागृहाच्या कामकाजासंदर्भात आमच्या आमदारांची बैठक आहे, शरद पवार कालच मुंबईत आले आहेत, दोन दिवसांमध्ये चर्चा करत निर्णय घेतला जाईल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर