ब्रेकिंग न्यूज
पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख…
SP News Maregaon

तरुण आज ना उद्या रस्त्यावर उतरतील:विजय वडेट्टीवार यांचा ‘CJP’ वरून इशारा; मुख्यमंत्री मुलांच्या मनातील खदखद दूर करतील – मुश्रीफ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारने कॉक्रोच जनता पार्टीचे ट्विटर हँडल बॅन केल्याप्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. तरुण रस्त्यावर उतरले तर आपली काय गती होईल अशी भीती सरकारला वाटत आहे. यामुळेच त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे ट्विटर हँडल बॅन केले आहे किंवा रोखले आहे, असे ते म्हणालेत. दरम्यान, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही देशातील पदवीधर व बेरोजगार तरुणांची मोहीम असल्याचे नमूद केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तरुणांच्या मनातील खदखद दूर करतील असा ठाम विश्वासही व्यक्त केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही दिवसांपूर्वी बेरोजगार तरुणांचा उल्लेख कॉक्रोच अर्थात झुरळ म्हणून केला होता. त्यानंतर अभिजीत दीपके या मराठी तरुणाने सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) स्थापन केली आहे. या पार्टीच्या हँडलला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे सरकारने या पार्टीचे एक्स हँडल बंद केले आहे. या प्रकरणी तरुणांतून संमीश्र प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर उपरोक्त शब्दांत निशाणा साधला आहे. सरकारला आपली गत काय होईल याची भीती – वडेट्टीवार विजय वडेट्टीवार म्हणाले, देशातील तरुण वर्ग कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून व्यवस्थेविरोधातील आपले मत व्यक्त करत आहे. त्यामुळे त्यांचे ट्विटर हँडल बॅन केले जाते किंवा थांबवले जाते. याचा अर्थ असा आहे की, सरकारच्या मनात भीती आहे. तरुण रस्त्यावर उतरला तर आपली काय गत होईल याची भीती सरकारला वाटत आहे. तरुण रस्त्यावर उतरणारच आहेत. आज ना उद्या हे होणारच आहे. त्यामुळे सरकार या देशातील तरुणांचा आवाज दाबू शकणार नाही. मुख्यमंत्री तरुणांच्या मनातील खदखद दूर करतील – मुश्रीफ दुसरीकडे, हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री तरुणांच्या मनातील असंतोष निश्चितपणे दूर करतील असा ठाम विश्वास व्यक्त केला. या देशातील अपमानित झालेले जे पदवीधर व बेरोजगार तरुण आहेत, त्यांनी ही मोहीम चालवली आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला ही वस्तुस्थिती आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री अतिशय हुशार आहेत. दूरदृष्टीचे आहेत. या मुलांच्या मनात जी अस्वस्थता आहे किंवा खदखद आहे ती संपवण्याचे काम ते निश्चितपणे करतील असा आम्हाला विश्वास आहे, असे ते म्हणाले. दोन पायाची झुरळे सरकारला सळो की पळो करून सोडतील -राऊत तत्पूर्वी, संजय राऊत यांनीही या प्रकरणी आपले मत व्यक्त केले. कॉक्रोच जनता पार्टीला तरुणांचे मोठे समर्थन मिळत आहे. त्यामुळे सरकार झुरळांना घाबरले आहे. या देशातील झुरळांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांच्यामुळे या झुरळांना मान-सन्मान व लढण्याची जिद्द यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. आता आळशी, बेरोजगार झुरळांना दोन पायांच्या झुरळांना चांगले दिवस येणार आहेत. ही झुरळे या सरकारला सळो की पळो करून सोडतील, असे ते म्हणाले. शेतकरी कर्जमाफी व इंधन टंचाईवरूनही सरकारवर निशाणा दुसरीकडे, विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी कर्जमाफी व इंधन टंचाईच्या मुद्यावरूनही सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा निर्धारच राज्यातील सरकारने केला आहे. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा करून कित्येक महिने उलटले, याबाबत अद्यापही शासन आदेश काढलेला नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला बाजारात कवडीमोल किंमत मिळत आहे, उत्पादनाचा खर्चही निघत नाही. त्यातच आता पेट्रोल / डिझेलच्या टंचाईमुळे शेतीची मशागत करणे अशक्य झाले आहे. नांगरणी झाली नाही, मशागत झाली नाही तर शेतकरी पिक घेणार कसा. डोक्यावर कर्जाचा डोंगर, घेतलेल्या पिकाला भाव नाही, पुढचं पीक घेण्यासाठी इंधन नाही, खतांचा प्रचंड तुटवडा या सर्व परिस्थितीत शेतकरी भरडला जातोय. या परिस्थितीतून मार्ग काढण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते मुख्यमंत्री मात्र सर्व काही छान आहे, इंधनाचा पुरेसा साठा आहे असं सांगताय, सत्य परिस्थिती नाकारण्याचा त्यांचा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर