ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

वडिलांच्या संपत्तीपेक्षा संस्कारांचा वारसा जपा- साध्वी सोनालीदीदी:पाळधीला राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात भाविकांना आवाहन‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | पाळधी
‘माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा’ या अभंगातील ओळींचा संदर्भ देत साध्वी सोनाली दीदी करपे यांनी राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात चौथ्या दिवसाची कीर्तनसेवा पार पाडली. वडिलोपार्जित संपत्तीसोबतच वडिलांनी दिलेले संस्कार, समाजसेवा आणि चांगल्या कार्याचा वारसाही पुढे नेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. युवतींना धर्म, संस्कार, कुटुंबाच्या प्रतिष्ठेप्रती निष्ठावान राहण्याचे आवाहन त्यांनी केले. क्षणिक आकर्षण, चुकीचे निर्णय आणि दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तींपासून दूर राहून जीवनातील प्रत्येक निर्णय विवेकाने घ्यावा, असा संदेश त्यांनी दिला. साध्वींच्या अभ्यासपूर्ण, ओजस्वी आणि समाजप्रबोधनपर कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. मंत्री गुलाबराव पाटील यांनी समाजसेवा, धर्मकार्य आणि वारकरी संप्रदायाच्या उन्नतीसाठी आयुष्यभर केलेले कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. सेवाकार्याचा वारसा पुढील पिढीने जपणे हीच खरी संतसेवा आहे, असे प्रतिपादन त्यांनी पाळधी येथील या किर्तन महोत्सवाच्या माध्यमातून केले आहे. यांची होती विशेष उपस्थिती गोप्रेमी गजानन महाराज वरसाडेकर, यज्ञेश महाराज माळी, कैलास महाराज पवार, मयूर महाराज दरेकर, परमेश्वर महाराज पारधीकर, निंबा महाराज वाघडूतकर, अनिल महाराज एकलग्नकर, गोपाल महाराज दापुरेकर यांच्यासह वारकरी संप्रदायातील महाराज आणि अन्य पदाधिकारी मंडळी उपस्थित होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर