ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

नाशिक प्रकरणात ‘TCS’ मलेशियाचा थेट संबंध:शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचा दावा, म्हणाले- MIM नेत्यांची चौकशी करावी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकमधील टीसीएस कंपनीतल्या हिंदु महिला कर्मचाऱ्यांसोबत सक्तीचे धर्मांतरण, लैंगिक आणि आर्थिक शोषणामागे मलेशिया आणि पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असून मलेशियातील टीसीएसचा थेट संबंध असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केला. नाशिक ‘टीसीएस’ प्रकरणी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुन निरुपम यांनी मलेशियात बसलेला फरार आरोपी इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक व ‘एमआयएम’च्या नेत्यांची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच पॉश कायद्याची (POSH) अंमलबजावणी करण्यास हलगर्जीपणा केल्याबद्दल ‘टीसीएस’वर कारवाई होणे आवश्यक आहे, असे निरुपम यांनी सांगितले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निरुपम म्हणाले की, ‘टीसीएस’ प्रकरणी न्यायालयात दाखल झालेल्या आरोपपत्रांमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पीडित हिंदू तरुणीचे धर्मांतर करण्यासाठी तिला सोशल मीडियावरील झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून तिचे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न आरोपींकडून सातत्याने करण्यात आला. या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी निदा खान, दानिश शेख, तौफिक अत्तार हे तिघेच सूत्रधार नाहीत तर त्यांच्या पाठीशी मलेशिया आणि पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय टोळ्या कार्यरत असल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे. दानिश आणि तौफिक हे पिडितेला मलेशियाला पाठवणार होते, असेही आरोपत्रात म्हटले आहे. त्यामुळे आरोपींचे मलेशियाशी थेट संबंध होते, हे स्पष्ट दिसतंय असे निरुपम म्हणाले. याच मलेशियात फरार आरोपी झाकीर नाईक लपून बसला आहे. या झाकिर नाईकची संस्था किंवा एजन्सी महाराष्ट्रात कॉर्पोरेट्समध्ये काम करणाऱ्या हिंदु मुलींना धर्मांतरासाठी टार्गेट करत आहेत का, याबाबत तपास यंत्रणांनी चौकशी करायला हवी, अशी मागणी निरुपम यांनी केली. निरुपम पुढे म्हणाले की, या प्रकरणातील आरोपी निदा खान ४० दिवस फरार होती. पोलीसांच्या शोध मोहीमेत ती छत्रपती संभाजी नगरमधील ‘एमआयएम’चे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरी कुटुबांसह सापडली. यात निदा खान आणि नगरसेवक मतीन पटेल यांना पोलीसांनी अटक केली. पोलीस चौकशीत मतीन पटेल याने वारंवार इम्तियाज जलीलचे नाव घेतले होते. जलील हे एमआयएमचे महाराष्ट्राचे प्रमुख आणि माजी खासदार आहेत. ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभागात निवडून आलेली ‘एमआयएम’ची नगरसेविका मुंब्र्याला हिरवे करणार असा दावा करते. यावेळी तिच्या सोबत असलेले इम्तियाज जलील तिथं केवळ मुंब्राच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र हिरवा करणार असे जाहीर वक्तव्य करुन वाद निर्माण करतात. त्यामुळे टीसीएस प्रकरणात ‘एमआयएम’चा सहभाग असू शकतो, असा आरोप निरुपम यांनी यावेळी केला. तपास यंत्रणांनी ‘एमआयएम’च्या नेत्यांनी सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणी निरुपम यांनी केली. संपूर्ण प्रकरण ज्या कंपनीत घडले त्या टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीवर पॉश कायद्याची (POSH) काटेकोर अंमलबजावणी करण्यास हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली. महाराष्ट्रातील बड्या कॉर्पोरेट्सची चौकशी करावी नाशिकमधील टीसीएस प्रकरणाची राज्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातील आयटी, फार्मा आणि मल्टी नॅशनल कंपन्यांमध्ये महिला कर्मचारी सुरक्षितरित्या काम करत आहेत का, याबाबत पोलीस आणि राज्य सरकारने चौकशी करायला हवी, अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर