ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

पाळत ठेवून अधिकाऱ्याच्या घरी चोरीचा दुसरा प्रयत्न

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे वर्ध्याचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या घरी पुन्हा एकदा पाळत ठेवून चोरीचा प्रयत्न झाला. परंतू, दार न उघडल्याने, चोरट्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागले. वर्षभरापूर्वी याच ठिकाणी घरफोडी करून तब्बल सात तोळे सोन्याचे दागीने लंपास करण्यात आले होते. या चोरीचाही अद्याप तपास लागला नाही. वांबोरीत पुन्हा एकदा पाळत ठेऊन चोरीचा प्रकार उघडकीस आल्याने राहुरी पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे. समर्थ शेवाळे यांचे वडील शंकर शेवाळे व आई सूमन शेवाळे वांबोरी येथील सुभाषनगर येथे राहतात. ते बुधवारी (२० मे) त्यांच्या बंधूंकडे अहिल्यानगरला गेले होते. ते घरी नसल्याचा फायदा घेऊन, त्यांच्या कंपाउंडवरून अनोळखी व्यक्तीने प्रवेश केला. कुलूप कोयंडा तोडला पण सेंटर लॉक न तुटल्याने चोरट्याचा डाव फसला. गुरुवारी दुपारी घरी परतल्यानंतर, घडलेला प्रकार शेवाळे दाम्पत्यांच्या लक्षात आला. आरोपी सीसीटिव्ही कॅमेऱ्यात दिसला आहे. यापार्श्वभूमीवर आता पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे. कारण यापूर्वी १९ मे २०२५ रोजी, दाम्पत्य बाहेरगावी असताना त्यांचे घर फोडले होते. त्यावेळी सात तोळे सोने व १.१० लाखांची कॅश चोरी गेली होती. चोरीच्या उद्देशाने शेवाळे यांच्या घरी कंपाउंडवरून उडी मारून एकाने प्रवेश केला. त्यावेळी चेहऱ्यावर मास्क नव्हता. सिसीटिव्हीत आरोपी कैद झाला आहे. त्यानंतर त्याने पुन्हा मास्क घालून दार तोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना रात्री १:४५ एकच्या सुमारास घडली. मास्क नव्हता, नंतर घातला

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर