ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

एसटीला डिझेल दरवाढीमुळे वर्षाकाठी 124 कोटी अतिरिक्त भार; भाडेवाढ नाही:प्रवाशांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी इंधन बचत, ई-बसचाही पर्याय

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाला डिझेल दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ३ रुपये १० पैशांची वाढ झाल्यामुळे महामंडळावर वार्षिक तब्बल १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली. सध्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला, तरी प्रवाशांवर तातडीने भाडेवाढ लादली जाणार नाही, अशी ग्वाही मंत्री सरनाईक यांनी दिली आहे. सोबतच, परिवहन विभागाने मनमानी कारभार करणाऱ्या ई-बाईक अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांनाही कडक नियमावली लागू केली आहे. ‘ओला-उबेर, रॅपिडो’ला कडक इशारा अन् नवे नियम “शासनाच्या अटी-शर्ती मान्य करूनच व्यवसाय करा, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही,’ अशा शब्दांत सरनाईक यांनी कंपन्यांना सुनावले आहे. भाडेवाढीच्या प्रस्तावावर प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर निर्णय सर्वसामान्य प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा यासाठी शासन इंधन बचत, ई-बसचा वाढता वापर आणि महसूलवाढीच्या इतर पर्यायांवर भर देत आहे. भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी पाठवला जाईल, त्यांच्या मंजुरीनंतरच अंतिम निर्णय होईल. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री असा पडणार ‘एसटी’वर आर्थिक बोजा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर