ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मेळाव्यात कौटुंबिक समस्या निवारण्यावर मंथन:पाटील समाज महिला मंडळ व कौटुंबिक समस्या समेट केंद्राच्या पुढाकाराने आयाेजन‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पाटील समाज अकोला अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पाटील समाज महिला मंडळ व कौटुंबिक समस्या समेट केंद्रातर्फे महिला मेळावा आयोजित करण्यात आला. मोठ्या उमरी परिसरातील संत श्री गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात संपन्न झालेल्या यात मेळाव्यात कौटुंबिक समस्या निवारण्यावर मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यात अध्यक्षस्थानी उमरीचे माजी सरपंच तथा ओम साई बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बळीराम कपले होते. प्रमुख अतिथी म्हणून पाटील समाज मंडळाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर, सचिव प्रदीप खाडे, पाटील समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली बहाकार, सचिव अॅड. दीपाली जानोरकर, सहसचिव संगीता दाळू, प्रा. राजेंद्र भुयार उपस्थित होते. संत श्री गजानन महाराजांचे पूजन करून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी प्रदीप खाडे यांनी प्रास्ताविक करून मेळावा आयोजनाचा हेतू विशद केला. महिला मंडळाच्या पुढाकारामधून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमास माधुरी कपले, उषा टिकार प. स. सदस्या, ज्योती मानकर, डॉ. सुरेश गावंडे, राधा राऊत, संध्या दांदळे, अनुसया गोंडचवर,अण्णा टाले,अशोक गावंडे, गजानन महल्ले, भोलेनाथ नळेकर, रमेश कोकाटे, अरुण बोन्द्रे, रोहिणी भारंबे, दीपाली बढे, वैशाली लाहे, निर्मला मोकाशे, नलिनी गावंडे, राधा मिरगे, जयश्री हातोलकर, मंगला थोरात, वर्षा शेलार, मीनल अलमाबादे, सुनंदा पवार, संगीता जंगले, रूपाली बिहाडे, मंदा वैद्य, ज्योती काकड यांच्यासह महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदीप खाडे यांनी मानले. कोर्टाची पायरी चढणे टाळा बळीराम कपले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात घरात उद्भवणाऱ्या समस्यांवर कुटुंबातील सदस्यांनी समजूतदारपणा घेऊन घराच्या चौकटीतच तोडगा काढावा, त्यास सार्वजनिक स्वरूप देऊन कोर्टाची पायरी चढणे टाळावे असे आवाहन केले.अॅड. दीपाली जानोरकर यांनी आपल्या सविस्तर मार्गदर्शनात कौटुंबिक समस्या समेट केंद्रामार्फत समस्या कशा निवारण करण्यात येतील यासह महिलांसाठी असलेल्या विविध कायद्या बाबत मार्गदर्शन करून या समेट केंद्राचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. वैशाली बहाकार यांनी महिलांनी जास्तीत जास्त संख्येत पाटील समाज महिला मंडळात सहभागी होण्याचे आवाहन केले. महिलांसाठी असणारे उपयुक्त कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा. राजेंद्र भुयार यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर