ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कारभार गतिमान करा; नागरी क्षेत्रांत सिटी सर्वे लागू करा:राज्याचे जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांचे निर्देश; प्रलंबित मोजणी प्रकरणांचा घेतला आढावा‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाच्या कामात पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. राज्याचे जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांनी अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यादरम्यान भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. “जिल्ह्यातील सर्व नागरिक क्षेत्रात सिटी सर्वे (नगर भूमापन) लागू करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यातील वाढत्या मोजणी प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि प्रशासकीय नियोजनाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आयुक्त नवाल यांनी पारनेर आणि अहिल्यानगर येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयांना भेटी दिल्या. पारनेर व अहिल्यानगर तालुक्यातील प्रलंबित प्रकरणे मुदतीत निकाली काढण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबत त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असलेली मोजणी प्रकरणे वेळेत निकाली काढण्यासाठी जिल्ह्यातून अतिरिक्त भूकरमापक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच परवानाधारक भूकरमापकांची मदत घेऊन करण्यात आलेल्या प्रभावी नियोजनाची माहिती आयुक्तांना देण्यात आली. आयुक्त नवाल यांनी नागापूर परिसरातील सुरू असलेल्या मोजणी कामाची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच मोजणी कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. नागरिकांच्या समस्या अधिक तत्परतेने सोडवण्यासाठी सर्वांनी अधिक जोमाने काम करावे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हा जिल्हा दौरा यशस्वी करण्यासाठी जिल्हा अधीक्षक संजय कुंभार, उपअधीक्षक भूमी अभिलेख अविनाश मिसाळ, भूमापन अधिकारी जितेंद्र भिंगारदिवे, भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवी डीक्रूज यांनी विशेष प्रयत्न केले. १५ दिवसांत मोजणी, ७ दिवसांत ‘क’ परत : नवा विशेष प्रकल्प जिल्ह्यातील मोजणी प्रक्रिया अधिक हायटेक आणि गतिमान करण्यासाठी आगामी जुलै महिन्यापासून एक विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत “१५ दिवसांत मोजणी व पुढील ७ दिवसांत ‘क’ परत पुरवणे बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात सर्व तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यपद्धती निश्चित केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर