ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

आता फुटण्याचा नंबर राष्ट्रवादी काँग्रेसचा का?:शशिकांत शिंदे म्हणाले – तो प्रश्न सोडून द्या, भाजपचा फुगा फुटल्यास जागा पुन्हा 2 वर येतील

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


“आता पुढचा नंबर तुमच्या, म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे,” असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे असून असा कोणताही क्रम किंवा ‘नंबर’ नसतो. त्यामुळे आमचा पक्ष फुटणार, अशी चर्चा करणे थांबवावे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. साताऱ्यात माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांवरही थेट निशाणा साधला. सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राला भेट देण्यासाठी ते साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडली. भाजपचा फुगा फुटल्यास जागा पुन्हा 2 वर येतील भाजपवर टीका करताना शिंदे म्हणाले, “पाशवी बहुमत मिळवण्याच्या नादात भाजपने स्वतःच्या पक्षातील निष्ठावंतांना बाजूला सारून आयारामांना महत्त्व दिले आहे. हा त्यांचा फुग्यासारखा फुगलेला अहंकार आहे. तो कधी फुटेल हे सांगता येत नाही, हे त्यांच्या नेत्यांनी लक्षात घ्यावे.” याच मुद्द्यावर अधिक खोचक टिप्पणी करताना त्यांनी सांगितले की, “भाजपचा हा फुगा फुटल्यानंतर त्यांची सदस्यसंख्या पुन्हा दोनवर येऊ नये, एवढेच पाहावे.” बंडखोर नेत्यांना ‘वाय-झेड’ सुरक्षा का लागतेय? उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या लोकसभा सदस्यांबाबतही शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. त्या-त्या मतदारसंघांमध्ये या नेत्यांविषयी जनतेत मोठा असंतोष असल्याचा दावा करत, तो कधीही उफाळून येऊ शकतो, असे ते म्हणाले. “आता त्यांना वाय-झेड सुरक्षा घ्यावी लागत आहे, यावरून परिस्थिती समजून घ्यावी,” अशी सूचक टिप्पणीही त्यांनी केली. राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा विषय संपला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार गट यांच्या संभाव्य विलिनीकरणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी हा विषय आता संपला असल्याचे सांगितले. याबाबत पुन्हा चर्चा करण्यास काही अर्थ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सातारा जिल्हा परिषदेच्या ‘राड्याचा’ पुनरुच्चार होणार? सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर चित्र अधिक स्पष्ट होईल, असा दावा करताना शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील गोंधळाचा संदर्भही दिला. “तेव्हाचा राडा जसा दिसला, तसाच प्रत्यय निकालाच्या वेळीही येईल,” असे त्यांनी म्हटले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर