ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

31 लाखाहून अधिक भक्तांनी घेतला महाप्रसाद:उन्हाळी सुट्ट्यांसह विविध सण-उत्सवांच्या मुहूर्तावर अन्नछत्र परिसर भाविकांनी फुलला‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून भक्तांच्या होणाऱ्या गर्दीकरिता केलेल्या उपाययोजना ह्या उल्लेखनीय व्यवस्थेमुळे भक्तातून समाधान व्यक्त होत असून, यामध्ये सुसज्ज वाहनतळ, महाप्रसाद रांग, भक्तांना राहण्याची उत्तम सुविधा, ऑनलाईन महाप्रसाद सेवा या सर्व सुखकर सोयी करण्यात आल्या आहेत. दि. १ मे ते ३१ मे दरम्यान अन्नछत्र मंडळात सकाळ व संध्याकाळ या दोन सत्रातील मिळून सरासरी महिन्याभरात ३१ लाखाहून अधिक भक्तांनी महाप्रसाद घेतला आहे. प्रचंड गर्दीत अन्नछत्र मंडळ गर्दी व्यवस्थापन करण्यामध्ये अव्वल ठरले आहे. तीर्थटनातून पर्यटन यामुळे न्यासाचा परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. १ मे महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा, अंगारक चतुर्थी, वैशाख अपरा एकादशी, ज्येष्ठ शुध्द कमला एकादशी, अमावस्या, अधिक मास, गुरुपुष्यामृत, अधिक मास पोर्णिमा, उन्हाळी सलग सुट्यांमुळे दिवसभर भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी होत आहे. पहाटे पाच वाजल्यापासूनच मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे अन्नछत्र व मंदिर परिसर गजबजून गेले. दुपारी ऊन वाढत असल्यामुळे स्वामी भक्त सकाळी सकाळी मंदिरात दर्शनासाठी व अन्नछत्र मंडळात गर्दी करत आहेत. अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील दर्शनानंतर भाविकांनी अन्नछत्र मंडळात महाप्रसादासाठी गर्दी केली होती. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाकडून भक्तांच्या सेवेर्थ विविध उपाययोजना करण्यात आल्याने भक्तातून समाधान व्यक्त होत आहे. वटवृक्ष देवस्थानात दर्शनानंतर भाविकांची पावले थेट अन्नछत्रात

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर