ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

इराण-अमेरिका तणावामुळे नागपूर विमानतळाला फटका:आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द, साडेचार महिन्यांत 74 कोटींचा महसूल

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाला आहे. या जागतिक संकटामुळे नागपूरहून दोहा येथे जाणारी ‘कतार एअरवेज’ आणि शारजाह येथे जाणारी ‘एअर अरेबिया एअरलाईन्स’ यांची विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मिहान इंडिया लिमिटेडकडून मागवलेल्या अधिकृत तपशिलातून ही माहिती समोर आली आहे. १ जानेवारी २०२६ ते १५ मे २०२६ या साडेचार महिन्यांच्या कालावधीत नागपूर विमानतळावरून एकूण १२ लाख २२ हजार ४१३ प्रवाशांनी प्रवास केला. यामध्ये ६ लाख १५ हजार ११६ प्रवासी बाहेरगावी गेले, तर ६ लाख ७ हजार २९७ प्रवासी नागपुरात आले. जानेवारी महिन्यात सर्वाधिक २ लाख ८६ हजार ३०४ प्रवाशांची नोंद झाली, तर मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात अंदाजे १ लाख ३९ हजार ५९८ प्रवाशांनी प्रवास केला. या साडेचार महिन्यांत मिहान इंडिया लिमिटेडला एकूण ७४.८६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या उत्पन्नामध्ये युझर डेव्हलपमेंट फीचा सर्वाधिक वाटा असून त्यातून ४,४४४.४७ लाख रुपये मिळाले. याशिवाय, एरोनॉटिकल इन्कममधून १,७४३.१३ लाख, नॉन-एरो इन्कममधून १,२०४.८८ लाख आणि कार्गो रॉयल्टीमधून ९३.५० लाख रुपयांची कमाई झाली. कार्गो हबचा विचार करता, १ जानेवारी ते १५ मे २०२६ दरम्यान कार्गो रॉयल्टीमधून एकूण ४.८० कोटी रुपये मिळाले. या काळात नागपुरात १५.४१ मेट्रिक टन माल आयात झाला, तर केवळ १.२३५ मेट्रिक टन माल परदेशात निर्यात करण्यात आला. याच कालावधीत नागपूर विमानतळावर व्हीआयपी आणि खाजगी उड्डाणांची मोठी वर्दळ दिसून आली. साडेचार महिन्यांत एकूण ३६० खासगी विमाने आणि १८३ हेलिकॉप्टर्स नागपूर विमानतळावर उतरली. या खासगी उड्डाणांमधून मिळालेल्या एकूण महसुलाची माहिती वित्त विभागाकडून संकलित केली जात असल्याचे मिहानच्या वरिष्ठ विमानतळ संचालकांनी आरटीआय उत्तरात स्पष्ट केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर