ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

नीट पेपर फोडणारे प्रमुख आरोपी पुण्याचे:एकमेकांपासून 1-2 KM च्या परिघात वास्तव्य; पुण्याचेच शिक्षक का? NTA वादाच्या भोवऱ्यात

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नीट पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही प्राध्यापकांचे पुण्यात एकमेकांपासून एक ते दोन किलोमीटरच्या परिघात वास्तव्य होते. देशात फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी शिकवणारे हजारो तज्ज्ञ प्राध्यापक आहेत. पण त्यानंतरही नीट सारख्या महत्त्वाच्या परीक्षेसाठी एकाच शहरातील 3 तज्ज्ञ प्राध्यापकांची निवड करण्यात आली. एनटीएच्या अधिकाऱ्यांनी असे का केले? यामागे त्यांचा काय हेतू होता? असे विविध प्रश्न आता या प्रकरणी उपस्थित होत आहेत. त्यामुळे संपूर्ण नॅशनल टेस्टिंग एजन्सीच आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) आतापर्यंत पुण्यातील 4 जणांना अटक करण्यात आली आहे. यात पी व्ही कुलकर्णी, मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे व मनीषा हवालदार यांचा समावेश आहे. यापैकी कुलकर्णी हा केमिस्ट्रीचा तज्ज्ञ म्हणून एनटीएच्या समितीवर होता. तर मनीषा मांढरे व मनीषा हवालदार या दोन्ही प्राध्यापिका अनुक्रमे बायोलॉजी व फिजिक्स विषयाच्या तज्ज्ञ म्हणून पेपर सेटर समितीवर कार्यरत होत्या. हे तिन्ही आरोपी पु्ण्यातील शिवाजी नगर, डेक्कन व बुधवार पेठ या एक ते दोन किलोमीटरच्या परिघात शिक्षण संस्थेत किंवा क्लासमध्ये शिकवत होते. पुण्याच्याच तिघांची एनटीएवर निवड का? मनीषा हवालदार या बुधवार पेठेतील एका शाळेत शिकवत होत्या. त्या तिथे मुख्याध्यापिका होत्या. तर मनीषा मांढरे या शिवाजीनगर भागातील मॉडर्न महाविद्यालयात शिकवत होत्या. तर पी व्ही कुलकर्णी डेक्कन परिसरातील एका खासगी क्लासमध्ये शिकवत होते. हे तिन्ही ठिकाणे एकमेकांपासून जवळच आहेत. देशात रसायनशास्त्र, जीवशास्त्र व भौतिकशास्त्राचे हजारो प्राध्यापक आहेत. त्यानंतरही या तिघांचीच निवड एनडीएमध्ये का करण्यात आली? असा प्रश्न या प्रकरणी उपस्थित होत आहे. या प्रकरणी एनटीएच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित होत आहे. परिणामी, एनटीएमधील सर्वच मोठ्या पदांवरील अधिकाऱ्यांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. तिन्ही मनीषांचा एकमेकांशी संबंध काय? सूत्रांच्या माहितीनुसार, प्रा. मनीषा मांढरे व मुख्याध्यापिका मनीषा हवालदार या केवळ मैत्रिणी नव्हत्या, तर नीट पेपरफुटीच्या खेळातील एकमेकींच्या अत्यंत जवळच्या भागीदार होत्या. या दोन्ही मनीषा एकमेकींना चांगल्या ओळखत होत्या. त्यांच्या अनेकदा भेटीगाठी झाल्या होत्या. या भेटीगाठीतूनच देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य विकण्याचा घाट घातला गेला. मनीषा मांढरे व मनीषा वाघमारे यांची ओळख पार्लरमध्ये झाली. याच ओळखीतून हा कट आणखी पुढे गेला. मनीषा वाघमारेने विद्यार्थी व पालकांशी संपर्क साधून त्यांना मनीषा मांढरेकडे पाठवले. मनीषा हवालदारची एनटीएने फिजिक्स विषयाची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. त्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या अतिगोपनीय प्रक्रियात सहभागी होत्या. त्यामुळे त्यांची मुख्य प्रश्नांपर्यंत पोहोच होती. त्यांनी आपला पदाचा गैरवापर करत फिजिक्सचे प्रस्न मनीषा मांढरेसोबत शेअर केले. सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे की, या दोघींनी लीक केलेले प्रश्न व प्रत्यक्ष नीटच्या परीक्षेत आलेले प्रश्न अगदी हुबेहुब होते. पहिली, दुसरीच्या चौकशीतून तिसरी मनीषा जाळ्यात सीबीआयने शिवराज मोटेगावकर, पी व्ही कुलकर्णी, मनीषा वाघमारे व मनीषा मांढरे यांची कसून चौकशी केली. त्यातून मनीषा हवालदारचे नाव पुढे आले. त्यानुसार, सीबीआयने शुक्रवारी पुण्यातील शेठ हिरालाल सराफ प्रशालेत छापेमारी करत मनीषा हवालदार यांना अटक केली. विशेष म्हणजे मनीषा हवालदार अवघ्या महिन्याभरातच सेवानिवृत्त होणार होत्या. पण निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच त्यांच्या पापाचा घडा फुटला आणि आता त्या तुरुंगाची हवा खात आहेत. मनीषा हवालदारचे दोन्ही मुले परदेशात मनीषा हवालदार सदाशिव पेठेतील लक्ष्मी निवास सोसायटीत राहतात. गेल्या 23 वर्षांपासून त्यांचे तिथे वास्तव्य आहे. त्यांच्या दोन्ही मुलांचे शिक्षण परदेशात सुरू आहे. सीबीआयने काल त्यांच्या फ्लॅटची झाडाझडती घेतली. त्यात काही महत्त्वाच्या वस्तू व कागदपत्रे त्यांनी जप्त केले. यावेळी मनीषाही त्यांच्यासोबतच होत्या. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मनीषा हवालदार ज्या शाळेत कार्यरत होत्या, त्या शाळेचे सचिव सतीश भालचंद्र गवळी त्यांच्याविषयी सांगतात, मनीषा हवालदार 1992 पासून या विद्यालयात कार्यरत आहेत. सध्या त्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. नीट पेपरफुटी प्रकरणी त्यांना अटक झाल्याचे आम्हाला माध्यमांतूनच कळले. मनीषा हवालदार एनटीएवर होत्या हे आम्हाला माहितीच नव्हते. त्यांनीही आम्हाला अंधारात ठेवले. संस्थेकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयची टीम काल आमच्या शाळेत आली होती. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज, मनीषा हवालदार जो संगणक वापरायच्या त्याचे हार्ड डिस्क व इतर दस्तऐवज त्यांनी जप्त केले. या प्रकरणामुळे शाळेची खूप बदनामी झाली. त्या असे करतील असे आम्हाला कधीही वाटले नाही, असे ते म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर