ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मुलगी झाल्यामुळे विवाहितेला तीन तलाक:नागपुरातील धक्कादायक घटना, पतीसह सासू विरोधात गुन्हा; नेमका काय प्रकार घडला वाचा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुलगी झाल्यामुळे विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला तीन तलाक दिल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या इतवारी – मस्कासाथ परिसरात समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती व सासूविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पीडित महिलेचा 31 मे 2024 रोजी जाफरनगर येथील एलन व्हिला येथे इमरानसोबत मुस्लिम पद्धतीने विवाह झाला होता. महिलेचे हे पहिले, तर इमरानचे दुसरे लग्न होते. विवाहानंतर काही महिने सर्वकाही सुरुळीत सुरू होते. पण ऑगस्ट 2025 मध्ये पीडितेला मुलगी झाली आणि घरातील वातावरण बदलले. तक्रारीनुसार, मुलगी झाल्याच्या कारणामुळे पीडितेचा पती व सासूकडून तिला सतत टोमणे मारले जात होते. तिचा मानसिक छळ केला जात होता. तसेच मारहाणही केली जात होती. 24 एप्रिल रोजी पतीकडून झालेल्या मारहाणीप्रकरणी महिलेने तहसील पोलिसांत तक्रार दाखल केली. पण त्यानंतरही तिचा छळ थांबला नाही. पोलिसांनी घेतली घटनेची गंभीर दखल पीडितेचे पतीने काही दिवसांपूर्वी पुन्हा तिला मारहाण केली. त्यानंतर तिला तोंडी तीन तलाक दिला. यावेळी आरोपी इमरानचा एक मित्रही घटनास्थळी उपस्थित होता. पीडितेने त्याच्याकडे मदतीची विनंती केली. पण त्याने कोणतीही मदत केली नाही, असा दावा पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे देशात तीन तलाकवर कायद्याने बंदी आहे. त्यामुळे पोलिसांनी तिची तक्रार गांभीर्याने घेतली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांनी याविषयी बोलताना सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता व मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण कायद्यांतर्गत पती व सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन तलाक विरोधी कायद्यात काय आहे शिक्षा? केंद्र सरकारने 2019 मध्ये तीन तलाक विरोधी ‘मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायदा 2019’ मंजूर केला. या कायद्यांतर्गत पतीने पत्नीला तोंडी, लेखी, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा कोणत्याही प्रकारे एकतर्फी तिहेरी तलाक दिल्यास तो अवैध व बेकायदा मानला जातो. या कायद्यानुसार, आरोपी पतीला कमाल 3 वर्षांपर्यंत कारावास व दंडाची शिक्षा होऊ शकते. हा गुन्हा दखलपात्र असून पोलिसांना थेट गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे. मात्र, न्यायालयाच्या परवानगीशिवाय आरोपीला जामीन मिळू शकत नाही. तसेच पीडित महिलेला स्वतःसाठी आणि अल्पवयीन मुलांसाठी निर्वाहभत्ता मागण्याचा अधिकारही या कायद्यात देण्यात आला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर