ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

केमिस्ट्री, बायोलॉजीनंतर फिजिक्स पेपरसेटरलाही पुण्यातूनच पकडले:नीट पेपरफुटीच्या पुराव्यासाठी सीबीआयची रद्दीच्या दुकानात झडती

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय पथकाने शुक्रवारी पुण्यातील शुक्रवार पेठेतील रहिवासी, एनटीएची फिजिक्सची पेपरसेटर मनीषा हवालदारला अटक केली. नीट प्रकरणात महाराष्ट्रातील ही सातवी अटक आहे. दरम्यान, लातूरमध्ये सीबीआयने शुक्रवारी एका बीएएमएस डॉक्टर व बालरोग तज्ज्ञाची कसून चौकशी केली. या बालरोगतज्ज्ञाच्या मुलाने पेपर संपताच नोट्स विकल्याचे सांगितल्यामुळे पथक रद्दीवाल्याच्या दुकानातही पोहोचले होते. दरम्यान, परभणी, हिंगोली येथेही शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने छापे टाकले. दोन दिवस सीबीआयच्या ताब्यात राहून सीबीआयचे साक्षीदार झालेले लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे घरी परतले. त्या दरम्यान, लातुरात ठाण मांडून बसलेले सीबीआयचे पथक ॲक्टिव्ह मोडवर आले. ४ अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जुना औसा रोडवरील डॉ. मनोज देशमुख यांची त्यांच्या घरात चौकशी केली. त्यांच्या मुलाने दिलेल्या नीटविषयी प्रश्न विचारले. त्यांच्या मुलाने सोडवलेली नीटची प्रश्नपत्रिका ताब्यात घेतली. त्यानंतर दयानंद कॉलेज रोडवरील बालरोगतज्ज्ञ डॉ. विनोद स्वामींचीही चौकशी केली. त्यांचा मुलगाही परीक्षार्थी होता. मनीषा हवालदार-मनीषा मांढरे कनेक्शन सेठ हिरालाल सराफ प्रशालेत कार्यरत पेपरसेटर मनीषा संजय हवालदार नीट यूजी २०२६ च्या प्रक्रियेत होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) तिची भौतिकशास्र तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. मनीषा हवालदारला भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिका माहिती असल्याने तिने काही प्रश्न एनटीएची जीवशास्त्रतज्ज्ञ मनीषा मांढरेला एप्रिल महिन्यात दिले. हे प्रश्न आणि नीट प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न यांची पडताळणी केली असता काही प्रश्न तंतोतंत जुळले. त्यामुळे मनीषा हवालदारला सीबीआयने शुक्रवारी अटक केली. डॉक्टरच्या मुलाने नोट्स रद्दीत विकल्या होत्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वामींच्या घरी पोचलेल्या सीबीआय पथकाने डॉक्टरांकडे त्यांच्या मुलाने नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी वापरलेल्या नोट्स, पुस्तके, वह्या कुठे आहेत, असे विचारले. त्यांनी हे सर्व रद्दीत विकल्याचे सांगितले. म्हणून रुग्णालयातील कर्मचाऱ्याला सोबत घेऊन पथकाने दयानंद महाविद्यालय परिसरातील रद्दीवाल्यास शोधले. त्याला डॉक्टरांच्या समोर हजर केले तेव्हा त्या रद्दीवाल्याने डॉक्टरने मला रद्दी विकलेलीच नसल्याचे पथकाला सांगितले. त्यानंतर हे पथक प्रश्नपत्रिका घेऊन रवाना झाले. हवालदारचे निलंबन, पुढील कारवाई तातडीने सुरू भारतीय विद्या प्रसारणी सभा संस्थेचे सचिव सतीश गवळी यांनी सांगितले की, मनीषा हवालदारचे या घोटाळ्यात येणे ही घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आहे. संस्थेतील शिक्षिका असे गैरकृत्य करतील व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करतील असे आम्हास कधीच वाटले नाही. सभा व शाळा प्रशासनाने तिला निलंबित करून पुढील कारवाई सुरू केली आहे. संस्थेला अंधारात ठेवून हवालदार एनटीएवर मनीषा हवालदार १९९२ पासून भारतीय विद्या प्रसारणी सभेत कामास आहे. २०२४ पर्यंत ती अकरावी, बारावीला भौतिकशास्त्र शिकवत होती. २०२४ मध्ये सेठ हिरालाल शाळेमध्ये ती मुख्याध्यापिका झाली. तिने भारतीय विद्या प्रसारणी सभेच्या पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून एनटीएमध्ये स्वतःची नेमणूक करून घेतली. ३० जून २०२६ रोजी निवृत्त होणार असे कारण पुढे करून रजा घेत एनटीएची कामे करत राहिली. मनीषा मांढरेप्रमाणे तिने खास विद्यार्थ्यांसाठी खास क्लास घेतले होते का, याचा तपास सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर