ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

सर्वस्वाचा त्याग करणारे शेतकरी,पण आज तेच वंचित हे योग्य नाही:बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वर्धापन दिनात सुरेखा ठाकरे यांचे मत‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‘उदात्तता बाळगून राष्ट्र विकासार्थ सर्वस्वाचा त्याग करणारा समाजातील एकमेव घटक म्हणजे शेतकरी आहे.परंतु दुर्दैवाने तोच शेतकरी त्यांच्या हक्क व अधिकारापासून वंचित आहे,’ असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुरेखा ठाकरे यांनी व्यक्त केले. येथील पंचवटी चौक स्थित वऱ्हाडे मंगल कार्यालयात बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचा वर्धापनदिन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून त्या बोलत होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून सुनील राणा उपस्थित होते. महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांच्या न्याय व हक्कासाठी लढा देणारी मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वातील बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना एकमेव असल्याचे सुनील राणा यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष हा गेल्या १२ ते १५ वर्षांपासून सुरू असून प्रत्येक प्रकल्पग्रस्त हा प्रामाणिकपणे या संघर्षात सामील झालेला आहे. संघटनेच्या दीर्घ तथा तेवढ्याच प्रखर संघर्षात्मक लढ्याने विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे काम बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेने केले असल्याचे मनोज चव्हाण यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की. संघटनेने संपादन केलेल्या यशामागे या जिल्ह्यातील आजी-माजी आमदार खासदार व राजकीय नेत्यांनी आम्हाला साथ दिली. परंत कुणीही आमच्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम केले नाही. त्यामुळे मला माझ्या जिल्ह्यातील सर्व आमदार आजी-माजी खासदार व सर्व नेत्यांबद्दल आदर व सन्मान आहे. ४६ डिग्री सेल्सिअस तापमान असतानासुद्धा विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो प्रकल्पग्रस्तांनी आपली उपस्थिती दर्शविली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संघटनेच्या आजपर्यंतच्या कामाचा आढावा संघटनेचे उपाध्यक्ष प्रा.निलेश ठाकरे यांनी वाचुन दाखवला. पुढील नियोजना संदर्भात माहिती दिली. याप्रसंगी विदर्भातील प्रकल्पग्रस्तांच्या दहावी व बारावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मुला मुलींना संघटनेच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील नवीन जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्षाच्या नियुक्त्यासुद्धा करण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन संघटनेचे प्रवक्ते श्रीकृष्ण बैलमारे यांनी केले तर आभार मयुर विघे यांनी केले. यावेळी संघटनेचे सचिव गौतमजी खंडारे, सहसचिव अजय भोयर,कोषाध्यक्ष संजय गिद,जेष्ठ मार्गदर्शक राजाभाऊ काळे,संघटक राजु लोणकर, दिलिप कदम, मनोज तंबाखे, अरुण तायडे, अतुल मुळे, विवेक डेहनकर, अनिल मुंढे, लक्ष्मण बोडखे,सचिन ढवळे, रामेश्वर मेटे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या फोनवरुन शुभेच्छा कार्यक्रमा दरम्यान आमदार रवि राणा आणि आमदार बच्चु कडू यांच्यासह जिल्ह्यातील इतर राजकीय नेते व विविध चळवळींचे पुढारपण करणाऱ्यांनी फोनवरून वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर