ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

वाढलेली शक्ती दाखवून मित्रपक्षाच्या 3 जागा खेचण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू:विधान परिषदेसाठी फॉर्म्युला, भाजप-12, शिवसेना-3, राष्ट्रवादी-2

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विधान परिषद निवडणुकीत १७ जागांच्या वाटपाची प्राथमिक बोलणी नुकतीच झाली. त्यात भाजप-१२, शिवसेना (शिंदेसेना) -३, राष्ट्रवादी (अजित पवार गट) -२ असे जागा वाटप ठरले. वाढलेली शक्ती दाखवून मित्रपक्षाच्या तीन जागा खेचण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहे. या निवडणुकीत एकूण १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान होईल. यात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळेंची विधान परिषदेतील जागा रिक्त झाली आहे. त्या एका जागेसाठीही मतदान होईल. यात स्थानिक स्वराज्य संस्थातून आमदार निवडीसाठी जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद आणि मनपाचे नगरसेवक मतदान करतात. २०२०मध्ये जेव्हा या १६ जागांसाठी निवडणूक झाली होती. तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित पक्ष होते. त्यावेळी सत्तेत नसलेल्या भाजपने ६, सत्तेत असलेल्या शिवसेनेने ५, राष्ट्रवादी ३ आणि काँग्रेसने २ जागा मिळवल्या होत्या. जानेवारी-फेब्रुवारीत झालेल्या मनपा, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे संख्याबळ २०२०च्या तुलनेत खूप वाढले आहे. ही वाढलेली शक्ती दाखवून काही जागा अदलाबदलीचाही प्रस्ताव ठेवला आहे. सूत्रांनी सांगितले की, या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडे इच्छुकांची संख्या प्रचंड आहे. तिकीट मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षात गटबाजी सुरू आहे. त्यामुळे घोडेबाजार तसेच अंतर्गत गटबाजी, संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी सत्तेतील तिन्ही पक्षांनी १७ जागा महायुती म्हणून लढाव्यावत, यावर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या निवडणुकीत भाजप १२, शिवसेना ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ अशा जागा वाटपाचा फॉर्म्युला चर्चेत आहे. मात्र, हा निर्णय अंतिम नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार अंतिम शिक्कामोर्तब करतील. शिंदेसेनेच्या पवित्र्याने घोषणा लांबणीवर सूत्रांनी सांगितले की, जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा करावी, असा जोरदार प्रयत्न भाजपकडून गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. मात्र, शिंदेसेनेच्या पवित्र्याने घोषणा लांबणीवर पडली आहे. शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अधिकृत घोषणा करत नाहीत, तोपर्यंत अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. जागावाटपात सिटिंग-गेटिंग समीकरणापेक्षा पक्षाची ताकद आणि समन्वयाला सर्वोच्च प्राधान्य आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर